अनलॉकच्या प्रक्रीयेत अडकलेल्या राज्यभरातील व्यायामशाळा (जिम) सुरू करण्याच्या निर्णयावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. हजारो जिममालक, प्रशिक्षक आणि फिटनेसप्रेमी तरुणांचा प्रश्न अनेक आंदोलने आणि मोर्चांनंतर मार्गी लागणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले.
Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
राज्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम सुरू व्हाव्यात यासाठी बॉडी बिल्डर आणि जिम मालक संघटना पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
प्राचीन भारतीय संस्कृतीत ‘शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम् (बलवंत समाजच धर्मरक्षण करु शकतो) असे विचारसूत्र जाते. ते कालातील,चिरंतन आहे...बलदंड, सशक्त, निरोगी युवापिढीच समाज व राष्ट्राचे रक्षण, संरक्षण करु शकते, या व्यापक हेतूने चिनावल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांनी 1992 मध्ये विवेकानंद बहुउद्देशिय सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था स्थापन केली. तिच्या मूर्तीमंत प्रतीक आहे चिनावल-वाघोदा मार्गावरील अत्याधुनिक व्यायामशाळा.
मुंबई अग्निशमनदलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी व्यायामाची गरज असून अग्निशमनकेंद्रावर अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी महापालिका व्यायामशाळा उभारणार आहे.