पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ३९ जणांचा वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला.
Read More
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कुंडमळा येथील पूल कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर या घटनेतील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चदेखील राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे.
मुंबईतील हिमालय पूल कोसळल्यानंतर मुंबईसह एकूणच महानगर क्षेत्रातील पुलांच्या देखभालीचा, स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला. तेव्हा, महानगर क्षेत्रातील पुलांची सद्यस्थिती आणि या पुलांची देखभाल-दुरुस्ती यासंदर्भात नेमक्या काय प्रतिबंधात्मक योजना राबविता येतील, त्याचा ऊहापोह करणारा हा लेख...
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील हिमालय पादचारी पूल कोसळून सहा जण ठार, तर तीसहून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इतर पुलांची बांधकामाधीन कामे आणि पुलांच्या दुर्घटनांवरील उपाययोजना यांची माहिती देणारा हा लेख....पूल हे रस्त्याच्या वाटेतल्या नदी, नाले, रेल्वे, मेट्रो वा झोपड्या इ. अडचणींशिवाय लोकांना अतिवाहतुकीच्या वेळी रस्ता ओलांडता येण्यासाठी तसेच, रस्त्यावरून जाण्याच्या अडचणींना दूर करतो म्हणून महत्त्वाचे समजतात. पण, जर हेच पूल जीर्ण बनले, तर ते निश्चितच अप
गुरुवारी रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वेस्थानकाजवळील हिमालय नावाचा पादचारी पूल कोसळून सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. 35-36 जण जखमी आहेत म्हणतात. मन सुन्न करणारी ही घटना आहे. दक्षिण मुंबईतील हा परिसर अत्यंत वर्दळीचा समजला जातो. संध्याकाळी तर लोकांचे प्रचंड लोंढे या भागात लगबगीने धावपळ करीत असतात. अशात ही घटना घडावी, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे.
याशिवाय शहरातील १७८ पूलांची दुरुस्ती व ७७ पूलांची किरकोळ दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला
अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेतील जखमी महिला अस्मिता काटकर यांचा आज संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबईकरांची आज सकाळपासून चांगलीच दैना उडाली. अंधेरीला पूल पडला असल्या कारणाने पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम होत असताना मध्य रेल्वेही उशिराने धावत आहे.
रेल्वेरुळांवरून जाणाऱ्या पुलांच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी सर्वस्वी रेल्वेच्या माथी मारून महापौरांनीही पालिकेचे पालक असलेल्या शिवसेनेची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.