मुंबईतील पुलांची कामे आणि उपाययोजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019   
Total Views |




मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील हिमालय पादचारी पूल कोसळून सहा जण ठार, तर तीसहून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इतर पुलांची बांधकामाधीन कामे आणि पुलांच्या दुर्घटनांवरील उपाययोजना यांची माहिती देणारा हा लेख....पूल हे रस्त्याच्या वाटेतल्या नदी, नाले, रेल्वे, मेट्रो वा झोपड्या इ. अडचणींशिवाय लोकांना अतिवाहतुकीच्या वेळी रस्ता ओलांडता येण्यासाठी तसेच, रस्त्यावरून जाण्याच्या अडचणींना दूर करतो म्हणून महत्त्वाचे समजतात. पण, जर हेच पूल जीर्ण बनले, तर ते निश्चितच अपघातांना कारणीभूत ठरू शकतात.

मुंबईतील ब्रिटिशकालिन अनेक महत्त्वाच्या पुलांच्या उभारणीला जवळपास १०० ते १५० वर्षे झाली आहेत. त्यातील बरेचसे पूल आता धोक्याचे झाले आहेत. परंतु, वाहतुकीच्या मोक्याच्या जागी ते असल्याने त्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुनर्बांधणी करणे क्रमप्राप्त आहेच. पूल बांधकामाच्या विभागात सुमारे अर्धा डझन सरकारी यंत्रणा गुंतल्या असल्या तरी, अलीकडील प्रभादेवी (एल्फिन्स्टन) स्थानकात झालेली चेंगराचेंगरी व अंधेरीचा गोखले रोड पूल कोसळणे तसेच, १४ मार्चच्या संध्याकाळी डी. एन. रोडवरील पूल कोसळला, अशा अलीकडील मोठ्या दुर्घटना घडल्याशिवाय या विभागाला जाग येत नाही, हे दुर्देवी म्हणावे लागेल. हल्ली रेल्वेच्या पूल-खात्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण इ. महापालिकेमधील अभियंते तसेच सरकारी एमएमआरडीए, एमएसआरडीसी व पीडब्ल्युडीतील पुलाची कामे बघणार्‍या तज्ज्ञ मंडळींची धावाधाव झालेली दिसते. तसेच राष्ट्रीय महामार्ग बांधणारे खाते, लष्कराचे अभियंते व आयआयटीतील तज्ज्ञ यांनीदेखील पुलांच्या कामात लक्ष देणे महत्त्वाचे आहे. काही पुलांच्या दुरुस्त्या वा नवीन बांधणीची कामे सुरू आहेत. त्यात या पूल-अधिकार्‍यांचा समन्वय किती कमी पडतो, ते दृष्टिपथास येऊ लागले आहे. यात भर म्हणजे पोलीस खाते. त्यांच्या समन्वयाची खास जरूरी पडते.

गोखले पूल दुर्घटना

दि. ३ जुलै, २०१८ रोजी अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या या पुलावरचा एक पश्चिमेकडील पदपथ खाली कोसळला. या अपघातात तिघे जखमी झाले व दोन मृत्युमुखी पडले. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणतात की, “मार्च २०१९ पर्यंत हा पूल दुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. दुरुस्तीचा एकूण खर्च सुमारे ३.४ कोटी रुपये होणार आहे.” पश्चिम रेल्वेने सुरक्षेच्या कारणास्तव २९ पुलांच्या तपासणीतून लोअर परळ स्थानकाबाहेरील पूल, ग्रँट रोड पूल, मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, दादर येथील टिळक पूल, प्रभादेवीचा कॅरॉल पूल व महालक्ष्मीच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती व काहींची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ उड्डाणपूल, दुरुस्ती करण्याच्या पलीकडे गेले असल्याने ते पाडून त्यांची पुनर्बांधणी करणे, अतिमहत्त्वाचे आहे. भायखळा, ऑलिव्हन्ट, कॅरॉल, शीव, नाहूर, रे रोड, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, करी रोड, कोपरी व घाटकोपर इ. असून यातील आठ पूल हे १०० वर्षांहून जुने आहेत. या ठिकाणी रेल्वेने नवीन पूल बांधण्याचे ठरविले आहे.


चेंबूरचा अमरमहाल पूल वाहतुकीसाठी खुला

१९९५च्या सुमारास हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. परंतु, पुलावरून १० टनांऐवजी २५ टनांपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक झाल्यामुळे हा पूल नादुरुस्त झाला, असे सांगण्यात येत आहे. एप्रिल २०१७ पासून हा पूल दुरुस्तीसाठी बंद होता. त्यामुळे फार वाहतूककोंडी होत होती. पूल वाहतुकीसाठी खुला करण्यास नोव्हेंबर २०१८ चा काळ आला. वडाळा-ठाणे मेट्रो कामाची उंचीकरिता या पुलाच्या कामाला दुरुस्तीला वेळ लागला.

कर्नाक व हँकॉक पूल

१३७ वर्षांचा हँकॉक पूल २०१६ मध्ये पाडून आता ४० महिने झाले तरी, झोपडपट्ट्यांच्या अडथळ्यांमुळे अजूनही नवीन पूल बांधला गेला नाही. याकरिता न्यायालयाने रेल्वे व पालिका दोघांवर ठपका ठेवला आहे. माजगावच्या अडथळा ठरणार्‍या एकतानगरमधील ३७ झोपड्यांवर पालिकेने गुरुवार, दि. ७ मार्चला बुलडोझर चालविण्यास सुरुवात केली. पुलाच्या पुनर्बांधकामास आता गती मिळू शकेल. कर्नाक पुलाची आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांनी पाहणी करून पूल धोकादायक असल्याचे सांगितल्यावर तो पाडायचे ठरल. दीडशे वर्षांचा कर्नाक पूल सध्या अवजड वाहनांना बंद असून हलक्या वाहनांसाठी पण बंद झाला आहे. तो पाडण्याच्या कामास रेल्वेने टप्प्याटप्प्यांनी सुरुवात केली आहे. मुंबई पालिकेच्या पूल-पथकाने २९६ पुलांची स्ट्रक्चरल तपासणी करून १८ जीर्ण झालेले पाडण्यायोग्य, ६१ दुरुस्तीस योग्य, १०७ पुलांच्या छोट्या दुरुस्त्या करणे असे निर्णय घेतले आहेत. १८ जीर्ण पुलांपैकी चेंबूरचा टिळकनगर पूल, मालाडचा गांधीनगर पूल व मस्जिदचा यलो गेट एफओबी असे तीन पूल अतिशय धोक्याचे ठरले होते, ते पाडण्यात आले. उरलेले १५ पूल निविदा मागवून एप्रिलनंतर तोडण्यात येतील. केंप्स कॉर्नर व प्रिन्सेस स्ट्रीट या उड्डाणपुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल २८ कोटी, ३ लाख निधी मंजूर झाला आहे. इतरही अनेक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.


डिलाईल रोडवरच्या लोअर परळचा पूल तोडणे व पुनर्बांधण्याची तयारी

समन्वय साधून कामे कशी होतात, त्याचे उदाहरण म्हणून हे काम बघावे. पश्चिम रेल्वेच्या पूल-पथकाने हे साधले आहे. आयआयटी मुंबईने २४ जुलै, २०१८ ला पुलाची तपासणी केल्यावर तो पाडणे हितावह असल्याने जुलै २०१८ मध्ये तो बंद करावा, असे पालिकेने ठरविले. १५ ऑक्टोबरपासून रात्री चार तास मेगाब्लॉकची व्यवस्था करून पालिकेकडून पुढील ४८ दिवसांत पुलालगतच्या सर्व सेवावाहिन्या हलविण्याची व्यवस्था केली. हे मेगाब्लॉकचे नियोजन अशा तर्‍हेने ठरविले की पादचार्‍यांना ते कमीतकमी गैरसोईचे होईल. पूल तोडण्याच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे ट्रॅकच्या वरील भाग बॅरिकेड केल्यानंतर काँक्रिट स्लॅब कापणे व तोडणे ही कामे केली. त्यानंतर पोलादी गर्डर काढण्यास घेतले. प्रवाशांच्या संस्थांनी रेल्वेच्या या कामांची प्रशंसा केली. सर्व वाहनांना पूल बंद केल्यामुळे लोअर परळ, करी रोड व वरळीच्या व इतर पूर्व-पश्चिम प्रवास करणार्‍या वाहनचालकांची गैरसोय झाली. हा पूल १९२१ मध्ये बांधला होता. २०१९ मधील २ फेब्रुवारीच्या रात्रीपासून ११ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये १६० हून जास्त मदतनीस घेऊन ९८ वर्षांचा जीर्ण पूल सुरक्षितपणे तोडण्यात आला. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होण्याच्या आधी पूल-पुनर्बांधणी कामाची घाई करण्याची जरुरी असल्यामुळे निविदांचे सोपस्कार आधीच पार पदले. रेल्वेने पूल बांधणीच्या कामाला लवकर सुरुवात करण्यासाठी साईदत्त-डायनॅमिक-सोबती जे. व्ही. फर्म या कंत्राटदाराला मान्यता पत्र देण्याची क्रिया (ङजअ) लवकर पूर्ण केले. थोडक्यात, नवीन पुलाचे काम असे- रेल्वेचे पाच अस्तित्वातले ट्रॅक व एक जादा असे सहा ट्रॅक हिशोबात घेऊन गर्डर एका ८५ मीटर लांबीच्या स्पॅनमध्ये बसविणे, एकूण २७.५ मीटर रूंदीत सहा मार्गिकांचा पूल व दोन्ही बाजूंना पदपथ जरुरी असणार आहे. नवीन पुलाची उंची ५.८ मीटर (जुन्या पुलाची ४.९ मीटर होती) राहणार आहे. पायाच्या (र्षेीपवरींळेप) सलोह काँक्रिटमध्ये स्टेनलेस स्टील बार वापरणे जरुरी व वरच्या कामाकरिता उच्च दर्जाचे स्ट्रक्चरल स्टीलचे चार गर्डर वापरायला हवेत. आरओबीची दिशा पूर्वीच्या जुन्या पुलासारखीच हवी व तो ट्रॅकला ६४ अंशातून तिरका बसवायला हवा. या पुलाचे काम १० महिन्यांत पूर्ण करावयास हवे.

कल्याणचा पत्री पूल पाडणे

१०४ वर्षांचा जुना पूल मध्य रेल्वेने १८ नोव्हेंबर, २०१८ ला सहा तासांचा मेगाब्लॉक ठेवून पाच तासांमध्ये पाडला. त्या आधी आयआयटी मुंबईकडून त्याची तपासणी केली होती व तो धोक्याचा आहे असे ठरले होते. हा पूल कल्याण, भिवंडी, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई व शीळफाटा इ. ठिकाणी जाण्यास सोईचा ठरत होता. या पुलाला दोन २७ मीटर लांब स्टील गर्डर लावले होते व त्यांचे वजन ६० टन प्रत्येकी होते. तोडताना २५० ते ३०० माणसे होती. ५० अभियंते होते. ६०० व ४०० टनांच्या क्रॉलर क्रेन आणल्या होत्या आणि दोन १२० टनांच्या जादा आणल्या होत्या. अशाच प्रकारे गोरेगावचा मृणालताई गोरे पूल विस्तारणे, शीवचा उड्डाणपूल, कोपरीचा पूल, भिवंडीचा पूल इ. मोठे पूल पाडून दुरुस्तीच्या मार्गावर आहेत. सुरक्षिततेकरिता समन्वयाने ते बांधणे फार जरुरी आहे.

ठाणे खाडीवरील तिसरा पूल

पहिला वाशीचा पूल १९७३ मध्ये बांधला. पण, आता तो ओस पडला आहे. परंतु, तेथे आता आत्महत्यांचा अड्डा बनला आहे. बरेच तरुण-तरुणी तेथे आत्महत्या करण्यासाठी येतात, असे स्थानिक रहिवासी म्हणतात. गेल्या तीन वर्षांत ४३ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक मच्छिमार लोक उडी घेऊन बोटींद्वारे त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. सरकारने तेथे फेन्सिंग बांधायला हवे. १९९४ मध्ये दुसरा खाडी पूल १२ ते १५ हजार वाहनांची वाहतूक होईल, अशा अंदाजाने बांधला. परंतु, आता तो आठ पदरी बांधलेला पूल वाहनांची संख्या अचाट वाढल्यामुळे अपुरा पडायला लागला आहेतिसरा पूल दुहेरी असा सध्याच्या पुलाच्या दोन्ही बाजूना तीन पदराचा बांधला जात आहे. म्हणजे तो १४ पदरी बनेल. एमएसआरडीसीकडून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाची स्थूल किंमत रु. ७७५.६ कोटी अपेक्षित आहे. मुंबई महानगरात हजारो पूल बांधले जात आहेत व त्या कामात समन्वय, तंत्रज्ञान व धोका सांभाळणे इत्यादींकरिता मार्गदर्शनाची जरुरी पडते. ते तोडणे, बांधणे वा दुरुस्त करणे या कामांकरिता एक पूल अभियंता विभागाची जरुरी आहे. प्रत्येक वेळेला संरचनेच्या तपासणीकरिता आयआयटी मुंबई वा पूल बांधण्याकरिता लष्कराला बोलावणे योग्य नाही.




माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@