ओडिशातील जगन्नाथ मंदिराबाबत एक मोठी माहिती पुढे आली आहे. जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाने सर्व भाविकांसाठी एक ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ड्रेसकोड असेल तरच भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार आहे.
Read More
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रे परत घेतली जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे.
केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करू नये , असे फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी एका प्रपोजचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून वाद वाढल्याने मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. आता मात्र मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास पुर्णपणे बंदी आहे.
मंदिर समितीने घेतलेल्या ड्रेस कोडच्या निर्णयाचं प्रत्येक हिंदूंनी स्वागत केलं पाहिजे. असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंदिर समित्यांनी घेतलेल्या वस्त्रसंहितेच्या निर्णयाचे नितेश राणेंकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक हिंदूंनी आपल्या मंदिरात नियम पाळावेत असं आवाहनही त्यांनी केलं.
कर्नाटकातील हिजाब वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यावादावर सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांवर हिजाब समर्थकांची चांगलीच भंबेरी उडाली
शिवनमलाई श्री सुब्रह्मण्य स्वामी मंदिरातील महिला भाविकांसाठी ड्रेस कोड लिहिणारी नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या एका दिवसानंतर, हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्स विभागाने रविवारी एका कर्मचाऱ्यावर दोषारोप केला. त्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, विभागाच्या संमतीशिवाय त्याने 'चुकून' ही घोषणा केली.
राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच केलेल्या ड्रेसकोडच्या निर्णयावरून आचार्य तुषार भोसलेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना ट्विटरवरून टोला लगावला. "अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पोशाखाबाबत राज्य शासनाने नुकताच घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे.पण हा निर्णय शासकीय यंत्रणांचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांना सुद्धा बंधनकारक असावा. पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या 'दिशेला' जाताना जीन्स घालावी; सरकारी कामकाजात नव्हे" असे म्हणत ट्विट केले.
भाविकांना सकाळी ११ वाजेपर्यंतच घेता येणार दर्शन