काशी विश्वनाथ दर्शनासाठी आता पेहराव सक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |

kashi_1  H x W:


भाविकांना सकाळी ११ वाजेपर्यंतच घेता येणार दर्शन

वाराणसी : वाराणसीच्या जगप्रसिध्द काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शन करू इच्छिणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी पेहराव सक्ती अर्थात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


त्यानुसार आता स्पर्श दर्शन सकाळी ११ पर्यंत घेता येणार असून त्यानंतर पूजा होईल. पूजा झाल्यानंतर मात्र भाविकांना स्पर्श दर्शन घेता येणार नाही. स्पर्श दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांना साडी, तर पुरुष भाविकांना धोतर आणि कुर्ता घालावा लागेल. या पेहराव सक्तीनंतर पँट, जीन्स, शर्ट घालून आलेल्या पुरुषांना स्पर्श दर्शन घेता येणार नसले, तरी मंदिरात दुरून ते विश्वेशवरचे दर्शन घेऊ शकणार आहेत.


ज्जैन येथील महाकाळ मंदिरातही या प्रकारची पेहराव सक्ती पूर्वीच लागू करण्यात आली होती. स्पर्श दर्शन घेताना न शिवलेला कपडा परिधान करण्याची प्राचीन पद्धत आहे. दक्षिण भारतात अनेक मंदिरात पूजा करू इच्छिणाऱ्या अथवा नुसते दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनाही विशिष्ट प्रकारचे कपडे घालून दर्शन घेण्याची प्रथा पूर्वीपासून प्रचलित आहे.

@@AUTHORINFO_V1@@