‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या आकडेवारीनुसार, ‘एसआयपी’द्वारे भारतातील म्युच्युअल फंडची गुंतवणूक 27 हजार 269 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणार्या गुंतवणुकीने उच्चांक गाठला आहे. ‘एसआयपी’च्या एकूण खात्यांची संख्या 9.06 कोटींवरुन वाढून 9.19 कोटी इतकी झाली आहे. यानिमित्ताने म्युच्युअल फंड क्षेत्रातील भारतीय अर्थभरारीचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मंडळातून दोन स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण मिळेल. यासाठी वॉर्ड कार्यालयांमार्फत मंडळांशी संपर्क साधला जाईल.
२८८.१७ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
भारताचे आर्थिक धोरण हे संरक्षणवादी दृष्टिकोनातून बाहेर पडून जागतिक एकात्मतेच्या दिशेने विकसित होत आहे आणि त्यात धोरणात्मक स्वायत्तताही जपली जात आहे. देशांतर्गत क्षमता बळकट करताना जागतिक व्यापारात सक्रिय सहभाग ही भारताची दुहेरी रणनीती आहे, आत्मनिर्भरतेसह जागतिक सुसंगती.
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या विस्तारामुळे घडली आहे. भारतीय कामगारवर्गाच्या मनोवृत्तीत आणि जीवनशैलीत होत असलेल्या आमूलाग्र बदलाचे ते द्योतक आहे.
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. पण, आज आयात करणारे रेल्वे मंत्रालय, आता निर्यातदार म्हणून नावारुपास येत आहे, हे बाब सुखावणारी अशीच!
शनिवार दि. १४ जून रोजी इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रातील फेज 14 वरील प्रमुख प्रक्रिया युनिटवर हवाई हल्ला केला. यामुळे 12 दशलक्ष घनमीटर गॅस उत्पादन अंशतः थांबवावे लागले. हा हल्ला इराणच्या तेल आणि वायू पायाभूत सुविधांवर इस्रायलचा पहिला थेट हल्ला होता, जो क्षेत्रीय तणावात वाढ आणि जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील अस्थिरता दर्शवतो.
दि. 1 जून आणि 2 जून रोजी जम्मू विभागातील दोडा जिल्ह्यातील भादरवाह येथील सरकारी पदवी महाविद्यालयात तिसरा लॅव्हेंडर महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा महोत्सव म्हणजे नावीन्यपूर्णता, उद्योजकता आणि शाश्वत शेतीचा एक अनोखा संगमच! ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने जम्मू आणि काश्मीरमध्ये शेतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी, लॅव्हेंडर मूल्यसाखळी विकासाला एक मॉडेल म्हणून स्थान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. CSIR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन (CSIR-IIIM) द्वारे आयोजित या कार्यक्रमात शेतकरी, स्टार्टअप्स, श
गेल्या ११ वर्षांत भारताने साधलेली सर्वांगीण प्रगती पाहिली की अक्षरश: थक्क व्हायला होते. २०१४ साली जागतिक अर्थव्यवस्थेत जो देश दहाव्या स्थानी होता, तो आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. ज्या ‘मॉर्गन स्टॅनली’ने भारताचा उल्लेख २०१३ साली ‘असुरक्षित अर्थव्यवस्था’ असा केला होता, तीच ‘मॉर्गन स्टॅनली’ आज भारताच्या वाढीबाबत नवनवे अंदाज व्यक्त करत आहे. त्यानिमित्ताने विकासाच्या आणि सुशासनाच्या मोदी सरकारच्या मागील ११ वर्षांतील दमदार कामगिरीचा मागोवा घेणारा हा लेख...
‘जेपी मॉर्गन’ तसेच ‘मॉर्गन स्टॅनली’ यांसारख्या जागतिक वित्त संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्था तसेच भारतीय बाजारांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवतानाच, भारताच्या वाढीबाबत नवनवे अंदाज वर्तवले आहेत. येत्या काही काळात भारतीय शेअर बाजारदेखील ऐतिहासिक असा लाखांचा टप्पा पार करेल, हा त्यातीलच एक अंदाज. त्यानिमित्ताने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि महाराष्ट्रातील वर्धा-बल्लारशाह चौथ्या मार्गिकेचाही समावेश आहे.
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. तो साध्य होईल, यात कोणताही संदेह नाही. तसेच ‘विकसित भारता’त महाराष्ट्राचे मोलाचे योगदान राहील, हे निश्चित!
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला.
भारतीय इतिहासात दोन युगांचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे नेते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी. दोघांचे विचार, कार्यपद्धती आणि सामाजिक-राजकीय संदर्भ भिन्न असले तरी, भारताच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्रभक्तीसाठी त्यांच्या दृष्टिकोनात अनेक साम्ये दिसून येतात. या लेखाचा उद्देश म्हणजे सावरकरांच्या अर्थनीती, विदेशनीती व मूल्यनीती यांचा सखोल अभ्यास करून त्यांची तुलना मोदींच्या सध्याच्या धोरणांशी करणे, ज्यामुळे आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मितीचा नवा पाया समजून घेता येईल.
भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था झाला. देशाची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे नीति आयोगाने जाहीर केले. हे यश भारताच्या धोरणात्मक दूरदृष्टीचे, समन्वयित प्रशासकीय निर्णयांचे आणि 140 कोटी जनतेच्या सहभागाचे मूर्त उदाहरण ठरावे. 2014 सालानंतर केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि दिशा देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. ‘गुड गव्हर्नन्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.
पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आणि त्यांना संरक्षण देणार्यांच्या नांग्या ठेचल्या. मात्र, पाकिस्तान कितीही बेटकुळ्या फुगवून दाखवत असला, तरीही त्याची खरी शक्ती ही चीनचा पाठींबा हीच.परिणामी पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी, चीन नावाच्या रोगाचा उपचार आवश्यक ठरतो. चीनी पोपटाचा जीव व्यापारात अडकल्याने, त्यावरच घाव घालणे क्रमप्राप्त ठरते. पाकिस्तानसहित तुर्कस्तान आणि चीनला नामोहरम करण्यासाठी अर्थिक बहिष्कार कसा उपयोगी ठरेल याचा घेतलेला आढावा...
मध्य रेल्वेने, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ८६.७१% हेड-ऑन जनरेशन (एचओजी) परिचालन प्रभावीपणे साध्य केले आहे. या उल्लेखनीय प्रगतीमुळे पर्यावरणीय मंजुरी आणि ऑपरेशनल खर्चात अंदाजे १७०.७ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
Sanjiv Puri has projected a growth rate of 6.5 percent This projection is a reflection of the strong fundamentals, policy clarity and collective will of the Indian economy भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.5 टक्के दराने भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. व्यक्त केलेला हा अंदाज म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बळकट पायाचे, धोरणात्मक स्पष्टतेचे आणि सामूहिक इच्छाशक्तीचे मूर्त रूपच. सध्याची जागतिक स्तरावरील अनिश्चितता, व्यापार संघर्ष, जागतिक अर
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त केला. भारतीय अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा कायम असलेला विश्वास यातून अधोरेखित होतोच. शिवाय भारताबद्दल जग किती सकारात्मक आहे, याचेच हे द्योतक!
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनमानस प्रक्षुब्ध आहे. त्यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या मागणीने जोर धरलेला दिसतो. पाकिस्तान सध्या चहु बाजूंनी विविध संकटांनी वेढला आहे. याचा फायदा घेत, पाकिस्तानला अद्दल घडवता येऊ शकते. त्यासाठी असलेले मार्ग आणि उपाययोजना यांचा घेतलेला आढावा...
(India banned imports from Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
"भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. आमच्या पर्वतांमध्ये संगीत आहे, येथील नद्या कायम गुणगुणत असतात. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ भारतीय परंपरेत आहे. आमच्याकडे जगाला देण्यासाठी हर तऱ्हेचा कॉन्टेन्ट (आशय) आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड' हे स्वप्न साकार करण्याची", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज'च्या व्यासपीठावरून जगभरातील गुंतवणूकदारांना साद घातली.
‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर समीट 2025’ अर्थात ‘आयमॅक’ची सांगता याच आठवड्यात मुंबईत झाली. युरोप आणि मध्य-पूर्वेत व्यापारासाठी लागणारा वेळ 40 टक्क्यांनी कमी होऊन खर्चही 30 टक्क्यांनी कमी होणार आहे. याच विषयावर देश-विदेशांतील तज्ज्ञांचे मंथन ‘आयमॅक’ निमित्ताने घडले त्याविषयी...
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
(IMEC SUMMIT 2025) "एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था हे लक्ष्य ठेवून महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (आयमॅक) महाराष्ट्र पूर्णपणे सुसज्ज आहे. शिवाय पायाभूत सुविधांची कामे ही प्रामुख्याने प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आयमॅक केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर यात सहभागी सर्वच राष्ट्रांसाठी गेमचेंजर ठरेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'आयमॅक समीट २०२५'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Pakistan economic crisis दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या पाकचे आर्थिक कंबरडेच भारताने मोडले असून, सिंधू जलवाटप करार रद्द केला आहे. यातून काय साध्य होणार, असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना या नद्यांचे पाकसाठी असणारे महत्त्व समजून घ्यावे लागणार आहे. एकाचवेळी पाकी अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र, ऊर्जानिर्मिती, अन्नसुरक्षा यांच्यावर कठोर प्रहार भारताने केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने २२ एप्रिल रोजी सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामधील (ईएसए) २५ गावांची प्रारुप अधिसूचना जाहीर केली आहे (sawantwadi-dodamarg eco sensitive zone). मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे (sawantwadi-dodamarg eco sensitive zone). या प्रारुप अधिसूचनेतील गावांसदर्भातील काही हरकती नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे (sawantwadi-dodamarg eco sensitive zone). या हरकतीचा विचार करुन केंद्र सरकार पश्चिम घाटाच्या
(Solid waste management) देशातील कचर्याच्या समस्याने अधिकच उग्र रुप धारण केले आहे. त्याची कारणे असंख्य आहेत. त्यामुळे वेळीच या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी शासन आणि नागरिक या दोघांनीही काटेकोरपणे केल्यास या समस्येचे समाधान मिळू शकेल. त्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
America first जगभरातील बाजारपेठा आणि अर्थव्यवस्था आजमितीला एका नव्या तणावाच्या सावटाखाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अमेरिकेत येणार्या सर्व आयातींवर आयात शुल्क लावण्याच्या घोषणेची अंमलबजावणी दि. 2 एप्रिलपासून सुरू केली आहे. त्यानुसार चीन, युरोपियन युनियन, जपान, भारत आणि इतर अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांवर हे शुल्क आकारले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अपेक्षेप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून आले. अनेक देशांच्या भांडवली बाजारातही ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद उम
आर्थिक असमानता ही केवळ भारताची चिंता नसून, संपूर्ण जगाला हा प्रश्न भेडसावत आहे. स्वित्झर्लंडसारख्या श्रीमंत देशातही, मूठभरांच्या हाती देशाची संपत्ती एकवटली आहे. भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी, म्हणूनच केंद्र सरकार ठोस उपाययोजना राबवताना दिसून येते.
काँग्रेसमधील नवे अर्थतज्ज्ञ राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत, बँकिंग क्षेत्र संकटात असल्याचा आरोप केला असून, मोदी सरकार या स्थितीला जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. तथापि, आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा दावा दिशाभूल करणाराच ठरतो. भारतीय बँकिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर थकीत कर्जांच्या समस्येने ग्रासले होते आणि याची मुळे काँग्रेसच्या काळातील अनियंत्रित आणि बेजबाबदार कर्जवाटप धोरणांमध्येच सापडतात.
( Former ED chief sanjay kumar mishra in PM Economic Advisory Committee ) केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
‘बायो-इकोनॉमी’ अर्थात जैव-अर्थव्यवस्था म्हणजेच जीवाणू, शेती, वने, सागरी संसाधने यांसारख्या विविध नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादन, प्रक्रिया आणि सेवांवर आधारित अर्थव्यवस्था. अशाप्रकारची अर्थव्यवस्था ही अधिक पर्यावरणपूरक मानली जाते. सध्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनही सुरू असून, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचाही जैव-अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होताना दिसतो. त्यानिमित्ताने जैव-अर्थव्यवस्थेची वाढ आणि भविष्यातील व्याप्ती यांचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या अर्थअप्रचाराला सणसणीत चपराक बसली आहे.
( Minister Nitesh Rane on pilot project of eco-friendly water taxi in Mumbai ) मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान केल्या.
( Special Economic Zone for Fisheries Development Nitesh Rane ) राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. १८ मार्च रोजी पहिले सादरीकरण करण्यात आले.
‘क्रिएटर्स इकोनॉमी’ला एक अब्ज डॉलर्स इतका निधी देणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली खरी. पण, हे ‘क्रिएटर्स इकोनॉमी’ क्षेत्र म्हणजे नेमके काय? त्याचा आवाका तरी किती? याचा जागतिक पटलावर भारताला कसा फायदा होईल? याविषयीचे हे आकलन...
भारत हा २०२८ पर्यंत जगातील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास ‘मॉर्गन स्टॅनली’ने नुकताच व्यक्त केला आहे. वाढ अशीच होत राहिली, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २०३५ पर्यंत १०.३ ट्रिलियन डॉलर्स इतका असेल. त्यानिमित्ताने अर्थचिंतन...
आज होळीचा सण! त्यामुळे आता रंग, पिचकारी अशा विविध साधनांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, दिवसेंदिवस हा सण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करूनच साजरा केला जात आहे. त्यामध्ये होळीसाठीची सामग्री असो किंवा रंगपंचमीचे रंग असो. हे सारे काही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात कोणतीही कमतरता न ठेवता कसे साजरे करायचे याचा घेतलेला आढावा...
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
Holi Festival म्हटली की धुळवड आलीच.मात्र, रासायनिक रंगांचा बेरंग टाळुन नैसर्गिक रंगानी होळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक रंगांची कार्यशाळा आयोजित करून निसर्गातील रंगांचा प्रचार व प्रसार करून जनजागृती सुरू केली आहे.
कॅनडाच्या राजकारणातील आधुनिक इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची कारकीर्द ही गोंधळ, दुटप्पी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय अपयश यांचे मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे. त्यांनी खलिस्तानसारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर कॅनडाच्या जागतिक विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाले. ‘जागतिक हरित धोरण’ आणि मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांनी, आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेक भावनिक भाषणे केली. पण, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील अस्थिरतेने कॅनडाच्या व्यापार, गुंतवणूक आणि परराष्ट्र
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने काळजी घेतली गेली आहे.
दूरदर्शी विकासाचे व्हिजन लाभलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प काल विधिमंडळात सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वार्थाने समतोल प्रादेशिक विकासाला आणि सर्वसमावेशकतेला चालना देणारा ठरणार आहे. बळीराजा, उद्योजक, मच्छीमार, महिला, युवा, जनजाती अशा राज्यातील सर्व स्तरीय घटकांच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी महायुतीच्या या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित व्हावी. त्याचबरोबर पायाभूत
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला. यामध्ये राज्याच्या प्रगतीची, तसेच राज्यासमोरील आव्हानांची सखोल मांडणी करण्यात आली आहे. याच आर्थिक पाहणी अहवालाचा घेतलेला हा धांडोळा...
‘भिकीस्तान’ ही उपाधी मिळालेला पाकिस्तान आता अधिकृतरित्या ‘आतंकीस्तान’ बनला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड पीस’ या संस्थेने नुकतेच ‘ग्लोबल टेरेरिझम इंडेक्स, २०२५’ अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, दहशतवादाने प्रभावित झालेल्या ६५ देशांमध्ये बुर्किनो फासो हा देश पहिल्या क्रमांकावर, तर पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर असला, तरी स्वतःचे नाक कापून अपशकून करण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, हे नक्की!
एकीकडे विरोधकांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत भ्रम पसरवले जात असताना, राज्याची आर्थिक घडी सुस्थित असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक आणि सांख्यिकी संचालनालयाने सादर केलेल्या 'महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५' नुसार राज्याचा आर्थिक विकासाचा दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो देशाच्या ६.५ टक्के विकास दरापेक्षा अधिक आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या धोरणात्मक बदलांमुळेया क्षेत्राच्या वास्तविक स्थूल मूल्यवृद्धीत तब्बल ८.७ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
जागतिक पातळीवर असलेली वाढती अनिश्चितता तसेच, ट्रम्प यांच्या धोरणांचा तडाखा यामुळे जगभरात व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता अधिक. या अस्थिर वातावरणात विदेशी संस्थागत गुंतवणूकदार देशातून गुंतवणूक काढून घेत असले, तरी येणार्या काळात भारताची वाढ पुन्हा एकदा वेगाने होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
महाकुंभने देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली असून, चौथ्या तिमाहीत भारताची वाढ ७.६ टक्के दराने होईल, असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी, विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी येत्या काळात भारताची वाढ ७.८ टक्के दराने व्हावी लागेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
मध्ययुगीन काळात हिंदूंवर लादला गेलेला ‘जिझिया’ कर केवळ आर्थिक शोषणाचा विषय नव्हता, तर तो हिंदू संस्कृतीच्या अधोगतीसाठी रचलेला कट होता. आज, हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने मंदिरांच्या देणग्यांवर डोळा ठेवत, सरकारी तिजोर्या भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हिमाचल सरकारने, हिंदू मंदिरांना सरकारच्या योजनांसाठी अर्थसाहाय्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा निर्णय म्हणजे, त्या ‘जिझिया’चाचेच एक आधुनिक रुप आहे.