जगप्रसिद्ध अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे भारतात आगमन झाले आहे. टेस्लाचा भारतातील पहिले दालन मुबंई येथे सुरू झाला असून, भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आपली दमदार एण्ट्री केली आहे.
Read More
दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे ३४ मजली इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम झाल्याबद्दल मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने, मंगळवार दि.१ जूलै रोजी फटकारले. या प्रकरणी ‘विलिंग्डन व्ह्यू’ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य सुनील बी. झवेरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठने सुनावणीदरम्यान इमारतीच्या बेकायदेशीर बांधकामवर चिंता व्यक्त केली.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टे पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त (१) विक्रम कुमार यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पस्थळास भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला.
आंध्र प्रदेशच्या पलाकोल्लूतील लघूग्रह शोधक जान्हवी डांगेती हीच्या नावे एक अनोखा विक्रम रचला जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या पलाकोल्लू येथे राहणारी डांगेती जान्हवी २०२९मध्ये अंतराळात जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असलेल्या जान्हवीने नासाकडून घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण करत तीने हे यश संपादन केले आहे.
मुंबईत मरीन लाईन्स परिसरात एका इमारतीत मोठी आग लागली. सोमवार, २३ जून रोजी दुपारी १२:२६ वाजता 'मरीन चेंबर्स' या इमारतीत पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. ही इमारत झाफर हॉटेलजवळ आणि गोल मशीद शेजारी आहे. फ्लॅट क्रमांक ५०२ मध्ये ही आग लागली. लाकडी फर्निचर, वायरिंग, गॅस ट्यूब, गादी, छत आणि घरातील इतर वस्तूंमुळे आग पसरली.
मावळ तालुक्यातील कुंडमाळा परिसरात इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळल्याने रविवार दि. १५ जून रोजी, मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
" आपल्या संवैधनिक खंडपीठाने पर्यावरणीय न्यायाला उच्च स्थान दिले आहे आणि ते सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वेगळे करता येणार नाही असे वारवांर म्हटले आहे. पर्यावरणीय न्याय हा सामाजिक न्यायाचा भाग आहे." असे प्रतिपादन न्यायाधिश अभय ओक यांनी केले. शनिवार दि. ७ जुन रोजी सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्स (SILF) ने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
अलीगढ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात केंद्र सरकारने महाभियोग प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे. हा प्रस्ताव संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अग्निशमन दलामध्ये सध्या वापरात असलेल्या ६४मीटर शिडीपेक्षा अवघ्या एक मजल्या एवढ्या वाढीव ६८ मीटर शिडीसाठी अग्निशमन दलाने एका कंपनीवर तब्बल ४० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे. हे प्रकरण गंभीर असून या खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी शुक्रवार, दि. २३ मे रोजी केली. यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांना पत्र लिहिले आहे.
( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती.
मुंबईच्या विधानभवन परिसरात आग लागल्याची घटना घडली असून संपूर्ण परिसरात आगीचे धूर निघत आहेत. दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. यशवंत वर्मा यांच्या जळीत नोटाकांडामुळे न्यायालयाच्या नि:स्पृहतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, अहवाल आले आणि त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्या. वर्मा यांना राजीनामा देण्याची किंवा निवृत्ती स्वीकारण्याची सूचनाही केली. पण, न्या. वर्मा यांनी ही सूचना अमान्य केल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीसाठी आता संसदेत ‘महाभियोग’ चालवावा लागेल. पण, भारतीय न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांवरील कारवाईचे हे पहिलेच प्रकरण नसून, यापूर्वीही ‘महाभियोगा’ची
भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हत
जम्मू आणि काश्मिरच्या राजौरी भागात दि. १० मे च्या पहाटे पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये भारतीय अधिकारी राज कुमार ठाकूर हुतात्मा झालेत. त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यु झाला. हल्ल्यादरम्यान त्यांच्यासह असलेले दोन कर्मचारी देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील २५ वर्षीय जवान मुरली नाईक हुतात्मा झाले. आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्ली थांडा गावचे होते. नाईक यांचे आई वडील घाटकोपर येथे स्थायिक होते. मुरली यांनी २०२२ मध्ये भारतीय लष्करात भरती होऊन ८५१ लाइट रेजिमेंटमध्ये सेवा सुरू केली होती.
'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
मध्य रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा आणि तयारी वाढवण्याच्या सक्रिय प्रयत्नात, नागरी संरक्षण संघटनेने मुंबईतील प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक व्यापक मॉक ड्रिलचे यशस्वीरित्या आयोजित केले होते. विविध आपत्कालीन परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि सामान्य जनतेला सक्षम करणे आणि ते मजबूत करणे हा या सरावाचा उद्देश होता.
“२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मध्यस्थी एक प्रमुख साधन असेल आणि मध्यस्थी केवळ न्यायदानाला गती देत नाही तर न्यायालयांवरील भार सुध्दा कमी करते., असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शनिवार, दि. ३ मे रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भारतीय मध्यस्थता संघटनेच्या शुभारंभ आणि ‘पहिली राष्ट्रीय मध्यस्थता परिषद २०२५’च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
terrorist attack in Kashmir, there was a firestorm of public anger in the country There was a unanimous voice in the country to teach a lesson to Pakistan काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशामध्ये जनक्षोभाचा आगडोंब उसळला. सातत्याने भारताच्या संयमाचा उपमर्द करणार्या पाकिस्तानला धडा शिकवण्याबाबत जनतेचा एकसूर देशात उमटला. मात्र, असे असले तरीही पहलगामसारखे हल्ले हे एका मोठ्या सापळ्याचा भाग असू शकतात. त्यामुळे, भारत सरकारला जनमताबरोबर देशहिताचा विचार करणे क्रमप्राप्त असते.
country' first digital education portal in Maharashtra “डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून ‘महाज्ञानदीप’या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे,” अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
Jallianwala Bagh मध्ये जमलेल्या नि:शस्त्र जमावावर इंग्रज अधिकारी जनरल डायर आणि डेप्युटी कमिशनर आयर्व्हिंग यांनी 50 बंदूकधारी सैनिकांसह बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले, जखमी झाले. या निर्घृण हत्याकांडानंतर आधीच इंग्रजांविरोधात धगधगणारा असंतोष उफाळून आला. ही घटना घडली दि. 13 एप्रिल 1919 रोजी. उद्या या घटनेला 106 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...
Thane Fire कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना बुधवारी आगीच्या घटनांनी 'ठाणे' अक्षरशः धगधगले. मंगळवारी रात्री गायमुख जकात नाका येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने घोडबंदर भागात धुराचे लोट बुधवारी दुपारपर्यत दिसत होते. मंगळवारी रात्री लागलेली ही आग तब्बल १२ ते १३ तासानंतर अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
(Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब
( Nanasaheb Peshwa II Architect of India First War of Independence of 1857 ) ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ पुणे, ‘वेद वासुदेव फाऊंडेशन’, ‘इतिहासप्रेमी मंडळ’ पुणे, ‘थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’ पुणे, उत्तर प्रदेशातील अनेक संस्था आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी 1857च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे शिल्पकार नानासाहेब पेशवे द्वितीय यांची 200वी जयंती संयुक्तपणे साजरी केली. हा कार्यक्रम दि. 28 मार्च ते दि. 30 मार्चदरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील बिठूर येथील नानासाहेब पेशवे पार्क येथे पार पडला. संपूर्ण कार
( Unique initiative of Kalyan Fire Department ) आग लागल्यास कसा बचाव करावा, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कल्याण अग्निशमन दलाच्यावतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले.
Eid उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ईदच्या नमाज अदानंतर दोन पक्षांमध्ये दोनदा हाणामारी झाली होती. सिवाल खासमध्ये नामाद अदा केल्यानंतर मुस्लिमांच्या दोन्ही गटांमध्ये गोळीबार आणि दगडफेकीची घटना घडली. या हाणामारीत सहाहून अधिकजण जखमी झाले आहेत.
Proletsभारतीय संस्कृतीत आजही निसर्गाचे महत्त्व अबाधित आहे. अगदी आहारापासून ते रोजच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक बाबतीत निसर्गाशी आपला ऋणानुबंध जुळला आहे. पोषक आहाराच्या दृष्टीन अशीच गोष्ट म्हणजे, भरडधान्य अर्थात मिलेट्स. भरडधान्याचे वैशिष्ट्य असे की, यांच्यात भरपूर पोषणमूल्ये असूनही त्यांच्याकडे इतकी वर्षे कोणाचेच फारसे लक्ष गेले नव्हते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून जगभर ओळखले गेले. पोषणकारी भरडधान्यांच्या प्रेरणेतून मिहीर देसाई यांनी ‘प्र
मंगला मिरवणूक झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात मंगला मिरवणुकीदरम्यान, दोन समुदयांमध्ये संघर्ष उफाळून आल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी एकमेकांवर दमगडफेक केली होती. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हजारीबागचे एसपी घटनास्थळी होते आणि त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. ही घटना २५ मार्च रोजी मंगळवारी रात्री घडली असल्याची माहिती आहे.
हिंजवडीतील या जळीत कांड प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय. टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेली आग हा अपघात नसून हा घातपात असल्याचं पोलिस तपासांतून उघड झालंय. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला? बसचालकाने
Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत.
आशियातील पहिली महिला लोको पायलट आणि हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव यांच्याविषयी....
दि. २० मार्च रोजी जगभरात जागतिक बेडूक दिन साजरा केला जाईल. आपण नेहमीच सुंदर दिसणार्या गोष्टींकडे प्रामुख्याने आकर्षित होतो. बर्याचजणांना बेडूक सुंदर वाटत नाही. मात्र, बेडूक सुंदर का वाटत नाहीत? त्यांचे आवाज काही वेळा विक्षिप्त का असतात? ते आवाज कसे काढतात? याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
धारणा हे अष्टांग योगातील सहावे अंग आहे. धारणा म्हणजे एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. ‘धारणा’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. ‘धारा’चा अर्थ दृढता, स्थिरता, निश्चितता असा होतो. धारण करणे, वाहून नेणे, परिधान करणे, आधार देणे, राखणे, टिकवून ठेवणे, (स्मरणात) चांगली आठवण ठेवणे अशी क्रिया आणि मनाचे संयोजन किंवा एकाग्रता (श्वास नियंत्रण) असादेखील होतो. एकूणच ‘धारणा’ हा शब्द मनाशी संबंधित आहे.
भारतीय रेल्वेमध्ये सरळसेवा भरतीतून थेट नियुक्ती झालेल्या आणि पश्चिम रेल्वेवरील पहिल्या मोटारवुमन प्रीती कुमारी यांच्याविषयी....
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेता पृथ्वीक प्रताप लवकरच नव्या चित्रपटात झळकणार आहे. विनोदी आणि अतरंगी भूमिकांसाठी ओळखला जाणारा पृथ्वीक आता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर काम करुनसुध्दा आपली नाविन्याची हौस भागवण्यासाठी युट्युब चॅनल सारख्या अतिशय अवघड प्रांतात उडी घेतली, त्यातल्या नवीन आव्हानांना सामोरे जात, गोष्टी शिकत पुढे जाण्याचा अवघड प्रवास केला. स्टार्टअप्सना त्यांचा प्रवास मांडण्यासाठी आणि त्यांच्या संकल्पनांना जगासमोर आणण्यासाठी आपल्या Business Arena 365 या चॅनेलच्या निर्मितीची गोष्ट जाणून घ्या Mahendran Subramanian यांच्याकडून........
इंडीयाज गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील टिपण्णी केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला आहे. रणवीरने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Rahul Gandhi काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झारसुगुजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यावर आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी यासाठी परवानगी मागणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. अशातच आता पोलिसांनी या प्रकरणी स्पष्ट केले की, राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आणि त्यांची चौकशी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.
प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ बीअर बायसेप्स याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो भावनिक होताना दिसतोय, "मला खूप वाईट वाटतंय कारण सगळं काम थांबलं आहे. मला असं वाटतंय की मी दोषी आहे. पूर्ण टीमला मी असं एक्सपोज केलं. माझ्यामुळे सगळं काम थांबलं."
८० टक्के स्टार्टअप्स बंद का पडतात? स्टार्टअप्स ते युनिकॉन हा प्रवास प्रत्येकाला का जमत नाही? स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सशक्त असणे गरजेचे आहे, पण त्यासाठी नेमकं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर नवउद्यमींना सापडतच नाही. ही कसरत करताना उद्योजकांची आर्थिक कोंडी होते. नेमकी हीच कोंडी फोडण्याचा यशस्वी फॉर्म्युला जाणून घ्या Financial Fitness च्या Sudhir Khot यांच्याकडून.... @SudhirKhot
Mahakumbh Mela 2025 उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात २५ ते ३० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेनंतर आता महाकुंभामध्ये दुसऱ्यांदा आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवार ३० जानेवारी २०२५ रोजी सेक्टर २२ मध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या असून आग शमवन्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
चुकांमधून शिकतो तोच खरा माणूस. म्हणूनच म्हणतात की, अपयश ही यशाची ( Failure to Success ) पहिली पायरी आहे. पण, अपयशातून यशाकडे मार्गक्रमण करण्याची प्रक्रिया ही वरकरणी वाटते तितकी सोपी नाही. यामध्ये बाह्यप्रेरणा, अंत:प्रेरणेसह कृतज्ञतेचाही सराव करावा लागतो. हे सगळे नेमके कसे करावे, यासंबंधीचे उद्बोधक मार्गदर्शन करणारा हा लेख...
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी धोक्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये अनेक कलाकारांची घरं असून मोठ्या संख्येने ती जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले असून तेथे आणीबाणी जाहिर करण्यात आली आहेलॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून १७ जानेवारी २०२५ रोजी होणारा नामांकनाचा सोहळा पुढे
हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुर्दैवी गटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग लागली असून या आगीत जळून आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १००० पेक्षा अधिक इमारतींची राख झाली आहे. लॉस एंजेलिसची ओळख हॉलिवूड कलाकारांचे घर अशी असून येथे लागलेल्या भयाण आगीमुळे हॉलिवूडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या आपत्तीजन्य परिस्थितीमुळे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन निवासम यांनी तेथे आणीबाणीची घोषणा केली आहे.
(Fatima Shaikh) आधुनिक काळात स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेणार्यांत सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रणी आहे. त्यासाठी सर्व समाज कृतज्ञ आहे. सावित्रीबाई आणि जोतिराव यांना यासाठी सहकार्य करणार्या अनेकांची नावे ब्रिटिश कागदपत्रांमुळे लोकांना माहीत झाली आहेत.
मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथे गोळीबाराचा ( Navi Mumbai Firing ) प्रकार घडला. पाच ते सहा राऊंड फायर करुन आरोपी फरार झाला आहे. या गोळीबारात १ जण जखमी झाला आहे. सानपाडा रेल्वेस्टेशनजवळच्या डी-मार्ट परिसरात हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बाईकवर येऊन हा गोळीबार केल्याचा प्रकार दिसला आहे.
Jama Masjid उत्तर प्रदेशातील संभलमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या हिंसाचारात कट्टरपंथी आरोपी टिल्लनला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. टिल्लनने एसपी केके बिश्नोई यांच्यावर एका घराच्या छतावरून गोळीबार केला होता. एसपी बचावले असले तरीही बिश्नोई बचावले गेले असले तरीही त्यांचे पीआरओ या गोळीबारामध्ये जखमी झाले.
महासत्ता असलेल्या अमेरीकेच्या नवीन वर्षाची सुरूवात ही दहशतीच्या छायेत झाली आहे. केवळ २४ तासांच्या कालावधीत तीसऱ्यांदा अमेरीकेत दहशतवादी हल्ला झाला असून, या वेळेस हल्लेखोराने न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरातील एका नाइट क्लबला लक्ष्य केले होते. १ जानेवारीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली.
ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवाहर बाग वैकुंठभूमीत त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निध