राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केल्याने काँग्रेसचा तिळपापड

अखेर पोलीस प्रशासनाने काँग्रेसचे धरले कान

    14-Feb-2025
Total Views |

Rahul Gandhi
 
भुवनेश्वर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झारसुगुजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी परवानगी मागणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. अशातच आता पोलिसांनी या प्रकरणी स्पष्ट केले की, राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आणि त्यांची चौकशी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.
 
राहुल गांधी यांनी भारताविरोधात लढण्याबाबत विधान केले होते.  त्यामुळे ओडिशातील झारसुगुजामधील हिंदू संघटनांनी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ओडिशा काँग्रेस नेत्यांनी गुन्ह्याबाबत एक पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणी आता काँग्रेस नेते सुदर्शन दास यांनीही गुन्हा दाखल करत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे हे प्रकरण झारसुगुजामध्ये येते का? असा सवाल उपस्थित केला.
 
या प्रकरणी आता काँग्रेस ओडिशा पोलिसांनी महासंचालकांना भेटणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राज्यातील भाजप सरकारला खूश करण्यासाठी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा काँग्रेस नेता सिबानंद रे यांनी केला. सरकारी पदावर असलेल्यांविरोधात चौकशी करण्यासाठी पूर्वपरवानगी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणं आहे. 
 
दरम्यान, या प्रकरणामध्ये एफआरआय दाखल करण्याचे आदेश देणारे आयजी संबलपूर हिमांशू लाल यांनी काँग्रेस नेत्यांना कायदा समजावून सांगितला. आयजी लाल म्हणाले की, सामान्यत: ज्या ठिकाणी घटना घडली आहे. त्या ठिकाणीच गुन्हा दाखल करण्यात येतो. परंत जर ते विधान दुसऱ्या राज्यात करण्यात आले किंवा लोकांनी ते पाहिल्यास पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे.
 
राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे तक्रारदार दुखावला गेला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला, असे हिमांशू लाल म्हणाले. त्यावेळी हिमांशू लाल यांनी अधिकारक्षेत्राव्यतिरिक्त, त्यांनी सरकारी पदावर असलेल्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्याचे नियम सांगितले. दरम्यान, त्यांनी कलम १९७ अंतर्गत, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी परवानगी आवश्यक नसल्याचे सांगितले आहे.