ज्ञानवापी संरचनेच्या व्यास तळघरात पूजा सुरू राहणार, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुनावणीत मुस्लिम पक्षाला मोठा झटका देत व्यास तळघरात पूजा करण्यावर बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सुरू असलेले भोजशाळेतील सर्व्हेक्षण थांबविण्यासही नकार दिला आहे.
Read More
वाराणसीतील ज्ञानवापी परिसरात न्यायालयाने हिंदू पक्षाला पूजेचा अधिकार दिल्यानंतर, काही कट्टरपंथी दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. ज्ञानवापी प्रकरणाच्या निकालानंतर, सलमान अझरी नावाच्या मुफ्तींचे भाषण व्हायरल झाले आहे. हे भाषण जुनागडमधील एका कार्यक्रमातील आहे.
ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरातील पूजेला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका मुस्लिम पक्षांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेवर त्वरीत सुनावणी करण्यास नकार दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय ६ फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीक्षमतेस (मेटेनिबिलिटी) आव्हान देणाऱ्या मुस्लिम पक्षान दाखल केलेल्या सर्वच्यासर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्याचप्रमाणे हा खटला सहा महिन्यात निकाली काढण्याचेही निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली : वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने मंगळवारी ज्ञानवापी वादाशी संबंधित आठ खटल्यांवर एकत्रित सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरण पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलामधील मशीद परिसराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेली वस्तू शिवलिंग आहे की कारंजी आहे का, याची शास्त्रोक्त तपासणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुस्लिम पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा उल्लेख सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर मुस्लिम पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी केला
ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणात आढळलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ चाचणी करण्यात यावी, असा विनंती अर्ज हिंदू पक्षाकडून वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरण पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीची पूजा आणि उपासनेच्या हक्काचा दावा सुनावणीयोग्य असून या प्रकरणास ‘प्रार्थनास्थळे विशेष कायदा’ (प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट) लागू होत नाही. त्यामुळे याप्रकरणी पुढील सुनावणी दि. 22 सप्टेंबर रोजी होईल, असे सांगून वाराणसी जिल्हा न्यायालयाने नुकताच मुस्लीम पक्षाचा दावा फेटाळून लावला. त्यानिमित्ताने न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालाचा कायदेशीर अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात हिंदूंतर्फे कॅव्हेट दाखल
ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीची पूजा आणि उपासनेच्या हक्काचा दावा हा सुनावणीयोग्यच आहे.