(NIA) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी आयसिसच्या कट्टरतावाद प्रकरणात तामिळनाडूमधील १६ ठिकाणी छापे टाकले.
Read More
राजस्थानच्या जोधपूरमध्ये दि. २१ जून २०२४, शुक्रवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी रविवार, दि. २३ जून २०२४ शोध मोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेत ड्रोनची मदत घेण्यात आली होती. ड्रोनच्या साह्याने मिळालेले फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धक्काच बसला, कारण अनेक आरोपींनी मोठ्या प्रमाणावर घराच्या छतावर दगडांचा मोठा साठा करून ठेवला होता.
हरियाणातील फरिदाबादमध्ये अल्पवयीन दीपकची कट्टरपंथी तरुणांनी निर्घृण हत्या करून मृतदेह जाळला. दीपकने या कट्टरपंथी तरुणांना गायींची कत्तल करताना पाहिले होते, त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी फरिदाबादच्या अरुआ गावात राहणारा १७ वर्षीय दीपक घरातून बेपत्ता झाला होता.
उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी शहरात दि. ८ फेब्रुवारीला हिंसाचार उसळला होता. बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केल्याने हा हिंसाचार झाला. या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांकडून शस्त्रे हिसकावण्यात आली आणि पोलिस ठाणे पेटवून देण्यात आले.
हल्दवानी येथे पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिस-प्रशासनाच्या पथकावर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. दंगलखोर कट्टरपंथी जमावाने पोलिसांना घेरले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर येऊन दंगलखोरांच्या कृत्याची माहिती माध्यमांना दिली. यामध्ये अनेक महिला पोलीसही जखमी झाल्या आहेत.
कट्टरपंथी खलिस्तांनीना आळा घालण्यासाठी भारताच्या आवाहनावर ब्रिटनने मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटन सरकारने खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी नवीन निधीची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारत आणि ब्रिटन कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठी आधीच काम करत आहेत. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी ही माहिती दिली.