जोधपूर हिंसाचार! कट्टरपंथीयांनी योजना आखून केला हल्ला; घराच्या छतावरून पोलिसांनी जप्त केले २ ट्रॉली दगड
24-Jun-2024
Total Views |
जयपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये दि. २१ जून २०२४, शुक्रवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी रविवार, दि. २३ जून २०२४ शोध मोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेत ड्रोनची मदत घेण्यात आली होती. ड्रोनच्या साह्याने मिळालेले फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धक्काच बसला, कारण अनेक आरोपींनी मोठ्या प्रमाणावर घराच्या छतावर दगडांचा मोठा साठा करून ठेवला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या शुक्रवारी, जोधपूरच्या सूरसागर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका ईदगाहचे गेट हिंदू वस्तीच्या दिशेने उघडण्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले तेव्हा कट्टरपंथीयांनी जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून एका दुकानालाही आग लागली आहे.
हिंसाचाराच्या या घटनांमध्ये एका महिलेची दृष्टी गेली. या प्रकरणी आतापर्यंत ६५ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यापैकी ५१ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण परिसरात तणाव कायम आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहे. दरम्यान, घरांवर दगडफेक करण्यासाठी लोकांनी दगड गोळा केल्याचे समोर आले.
दगडफेक करण्याचा कट लोकांनी आधीच आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी जोधपूरमधील पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आल्याने रविवारी परिसरात शांतता होती. पोलीस दलाने संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरातून सुमारे दोन ट्रॉली दगड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घरातील लोकांची नावे घेऊन त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
घरांवर दगड सापडल्याच्या घटनेने हा वाद पाहता लोकांनी आधीच दगडफेक करण्याचे नियोजन केल्याची चर्चा रंगली आहे. सूरसागर परिसरात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना पाहता पोलीस आयुक्तांनी संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून कलम १४४ लागू केले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५१ जणांना अटक केली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाचे अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात येत आहे. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ५१ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ६५ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.