आयआयटी, आयआयएम प्रमाणेच आयआयसीटी प्रमुख संस्था म्हणून नावारुपाला येईल!

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विश्वास

    03-May-2025
Total Views |
आयआयटी, आयआयएम प्रमाणेच आयआयसीटी प्रमुख संस्था म्हणून नावारुपाला येईल!


मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या (आयआयसीटी) निर्मितीसाठी जागतिक पातळीवरील मनोरंजन संस्थांच्या सहकार्याला तत्वतः पाठिंबा देत हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. ३ मे रोजी या संदर्भात ही चर्चा झाली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला जाईल, ज्या प्रमाणे आयआयटी आणि आयआयएमचा दर्जा आहे. तत्सम दर्जा हा आयआयसीटीलाही मिळेल, त्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि ॲनिमेशन या क्षेत्रात संधी शोधण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण यामुळे लाभणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एक मोठे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र यानिमित्ताने उभे राहणार असून आयआयटी आणि आयआयएमच्या धर्तीवर या संस्थेची स्थापना केली जाणार आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, भारत मनोरंजन क्षेत्रात स्वतःला जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करेल. या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल असणार आहे. या कार्यात आमच्यासोबत येणाऱ्या प्रत्येकाचे आभार.”

दरम्यान यावेळी आघाडीच्या कंपन्यांनी अभ्यासक्रमाची रचना, इंटर्नशिप, शिष्यवृत्ती, स्टार्टअप्सना निधीपुरवठा आणि नोकरी मिळवून देण्यासाठी संस्थांनी सहकार्याची तयारी संस्थांनी दर्शविली आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी त्यांचे आभार मानले. दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओ स्टार ,ऍडोब , गुगल आणि युट्युब , मेटा , वाकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए (NVIDIA) यांचा समावेश आहे.

या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक मीडिया अँड एंटरटेनमेंट, एनव्हीडिया), संजोग गुप्ता (सीईओ, स्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेस, जिओ स्टार), माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक - एज्युकेशन, अ‍ॅडोब), प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्ष, गुगल इंडिया), राजीव मलिक (वरिष्ठ संचालक, वॅकॉम), संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुख, राज्य सरकार आणि आरोग्यसेवा), संदीप बांदीवडेकर (संचालक, मेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्स, मायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालक, सार्वजनिक धोरण, मेटा) यांचा समावेश होता.

आयआयसीटीचे संचालक मंडळाचे सदस्य आणि नियामक परिषदेचे सदस्य आशिष कुलकर्णी, बिरेन घोष, मानवेंद्र शुकुल, मुंजाल श्रॉफ, चैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आज उपस्थित होते. आयआयसीटीच्या कार्यकारी चमूमध्ये आयआयसीटीचे सीईओ डॉ. विश्वास देवस्कर, आयआयसीटीचे सीईओ निनाद रायकर आणि आयआयसीटीच्या विपणन प्रमुख श्वेता वर्मा यांचा समावेश आहे.






अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121