मुंबई : एसएनडीटी (SNDT) महिला विद्यापीठाच्या चर्चगेट कँपसमध्ये मराठीत एम.ए. करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमामुळे महिलांना मराठमोळी संस्कृती समजून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार असून दोन वर्षांसाठी हा अभ्सासक्रम असेल.
एसएनडीटी महिला विद्यापीठात मराठी विषयात एम. ए, करण्यास ईच्छूक असणाऱ्या महिलांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठातील मराठी विभागाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नोकरी/ व्यवसायाच्या अनंत संधी उपलब्ध
समृद्ध ग्रंथ भांडार
ज्ञानाची समृद्ध परंपरा
अद्ययावत अभ्यासक्रम
आनंददायी शिक्षण
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागाची संधी
व्यक्तिमत्व विकास/स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
या अभ्यासक्रमाकरिता ईच्छूक असलेल्या विद्यार्थीनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
संपर्क : डॉ. सुनील रामटेके, विभाग प्रमुख, (9561092617)
७ वा मजला एनएक्स इमारत, १ नाथीबाई ठाकरशी मार्ग, चर्चगेट मुंबई.
दूरध्वनी : 22031879 (विस्तारित -1304)