आपला कट्टा या संस्थेतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जागर इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रीचा’ असा या कार्यक्रमचा विषय आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कविता सादरीकरण स्पर्धा, नृत्याविष्कार स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा अशा या स्पर्धांचे स्वरूप असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहे. सादरकर्त्याचे नाव, सादरीकरणाचा विषय आणि सदरीकरणाची वेळ याचे तपशील आयोजकांना ९७३०७७५५७९ या क्रमांकावर पाठवायचे आहेत. या स्पर्धा फक्त महिलांसाठी आहेत. या स्पर्धा मोफत असून वयाचे कोणतेही बंधन नाही. अधिक माहितीसाठी ८७७९५६९०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.