भारताच्या सीमावर्ती भागातील बांधकामाला मोदी सरकारचा हिरवा कंदील
मोदी सरकारकडून ४४०० कोटींचा निधी
10-Oct-2024
Total Views | 268
नवी दिल्ली : पंजाब आणि राजस्थानला जोडलेल्या सीमावर्ती भागात २२८० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाला मोदी सरकारने हिरवा कंदील दिला. या प्रकल्पासाठी ४४०० कोटींहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील रस्ते व्यवस्था सुधारण्याचा अनेक दिवसांपासून विचार सुरू होतो आता तो सत्यात येणार आहे.
भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागात जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. मात्र सीमेलगतच्या भागात जाण्यासाठी या प्रकल्पामुळे अपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू आणि मदतीची वाहतूकही सहजरित्या करता येणार आहे.
दरम्यान रस्त्यामुळे पाकिस्तान नजीकच्या सीमेवरील काही भारतीय हद्दीतील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जीवनमान वाढणार आहे. रस्ते आणि दूरसंचार संपर्क, तसेच पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण सुविधांवर मोठा परिणाम होईल.