फेडरल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयपीओची घोषणा
17-Nov-2023
Total Views |
मुंबई : भांडवल उभारणीसाठी फेडरल बँकेची उपकंपनी असलेल्या फेडरल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ पुढच्या आठवड्यात बाजारात दाखल होत आहे. ही कंपनी किरकोळ कर्जावर अधिक लक्ष केंद्रित करते. कंपनी आपल्या ग्राहकांना सोने तारण कर्ज, गृहकर्ज आणि व्यवसाय कर्ज उपलब्ध करुन देते.
फेडरल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ बुधवार दि. २२ नोव्हेंबर रोजी उघडणार आहे. गुंतवणूकदार २४ नोव्हेंबरपर्यंत आयपीओ खरेदीसाठी अर्ज करु शकतात. कंपनीने आपल्या प्रस्तावित आयपीओसाठी प्रतिशेअर १३३ ते १४० रुपये किंमत निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या आयपीओची नोंदणी बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेयर बाजारांमध्ये केली आहे.
फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसच्या या आयपीओचा आकार सुमारे १,१०० कोटी रुपये असणार आहे. या आयपीओमध्ये ६०० कोटी रुपयांचे शेअर नव्याने बाजारात आणले जात आहेत. याशिवाय फेडरल बँक आणि आणखी एक भागीदार ट्रू नॉर्थ फंड मिळून सुमारे ३.५ कोटी शेअर विकणार आहेत.
कंपनी आयपीओमधून उभारलेल्या भांडवलाचा वापर व्यवसाय विस्तारासाठी करणार आहे. सध्या फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसची उपस्थिती देशातील १६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.