महाभारताचे ‘इंद्र’ करतायत मदतीची याचना!

    22-May-2020
Total Views | 171
satish kaul_1  

औषधे घेण्यासाठी देखील पैसे नाहीत; वृद्धाश्रमातून मागितली मदत


मुंबई : कोरोना संकटामुळे समाजातील अनेक घटकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. सामान्य नागरिकांसह काही वयोवृद्ध आणि आजारी कलाकारांनादेखील या परिस्थितीने हतबल झाले आहेत. रामानंद सागर यांच्या महाभारत या मालिकेत ‘इंद्र’देवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल सध्या औषधांसाठी मदत मागत आहेत. त्यांच्याकडे सध्या दोनवेळच्या अन्नासाठी देखील पैसे नाहीत. कोणी तरी औषधे द्या, अशी याचना ते करत आहेत.


‘महाभारत’ मालिकेबरोबरच ‘आंटी नंबर १’, ‘कर्मा’, ‘जंजीर’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘खुनी महल’ यांसारखे सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. एकेकाळी कोट्यावधीची संपत्ती असणारे सतीश कौल आज हलाखीचे जीवन जगत आहेत. चित्रपटांमधून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी अभिनय शाळा सुरु केली होती. मात्र ती नित चालली नाही. यामुळे त्यांच्याजवळ असलेला सगळा पैसा संपला. त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील त्यांना सोडून अमेरिकेत स्थायिक झाले.


एका वृत्तसंस्थेशी बोलताना सतीश यांनी सांगितले की, ते सध्या लुधियानातील एका भाड्याच्या घरात राहत असून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. या आधी ते वृद्धश्रमात राहत होते. लॉकडाऊनमुले सध्या परिस्थिती अजून खराब झाली आहे. औषधे, जेवण आणि इतर गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. अभिनेता म्हणून मला प्रेम दिलेत आता माणूस म्हणून मला मदत करा, अशी विनवणी त्यांनी केली आहे. अभिनयाची भूक अद्याप शमली नसून, कुठलेही काम मिळाले तरी करण्यास तयार असल्याचे देखील ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121