अकोल्यात १० तबलिगींपैकी चौघांची चाचणी; इतरांचा शोध सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
akola_1  H x W:


अकोला : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'तबलिगी' जमातीचे धार्मिक संमेलन अर्थात 'मरकज'मध्ये देशविदेशातून मोठ्या संख्येने मुस्लीम धर्मप्रचारक सामील झाले होते. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर या संमेलनातील सहभागी मुस्लीम धर्मप्रचारकांमुळे आता कोरोनाचे विषाणू थेट अंदमान बेटांपर्यंतही जाऊन पोहोचले आहेत.


यामध्ये महाराष्ट्रातीलही पाचशेपेक्षा अधिक मुस्लीम सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १० जणांनी या संमेलनात हजेरी लावल्याचे समजते. या सर्व कोरोना संशयितांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला असून यापैकी केवळ चार जण अकोल्यात परतले असून त्यापैकी तीन जणांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.


मुस्लिमांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या दहापैकी जे जिल्ह्यात अजून परतले नाहीत, त्यांची माहिती घेतली जात आहे.


अकोला जिल्ह्यात आजवर तरी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता या उर्वरित सहा जणांमुळे प्रशासनाच्या काळजीत भर पडली आहे. त्यामुळे या उर्वरित ६ मुस्लीम धर्मप्रसारकांनी आपली जबाबदारी वेळीच ओळखून स्वत:ची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय त्यांच्या नातेवाईकांशीही संपर्क करण्यात आल्याचे समजते.


निजामुद्दीन येथील 'तबलिगी' जमातीच्या 'मरकज'ला हजेरी लावण्यासाठी अकोल्यातून १० जण ७ मार्च रोजी दिल्लीत पोहोचले होते आणि ११ मार्च रोजी ते दिल्लीहून जिल्ह्यात परतले होते.


अकोला तालुक्यातील या १० कोरोना संशयितांपैकी अकोला तालुक्यातील ४, बार्शीटाकळी ३ आणि पातूर येथील ३ रहिवाशी असल्याचे समजते. परंतु, यापैकी केवळ ४ जणांबरोबर संपर्क झाला असून उर्वरित ६ मुस्लीम नागरिक परत जिल्ह्यात परतले नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. त्याचबरोबर या ४ कोरोना संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते.


@@AUTHORINFO_V1@@