मुंबई : (Devendra Fadnavis) "सध्या राज्यात नो टोलरन्स फॉर ड्रग्स मोहीम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत ड्रग्सचे जाळ जिथे आहे ती पाळमूळ खणून काढली जाणार आहेत. वेगवेगळे युनिट त्यामध्ये काम करत आहेत.रोज कुठे ना कुठे कारवाई सुरू आहे.
पुढचे काही दिवस ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे." असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि.७ रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना नागपूर येथे केले.
राज्यासह देशभरात ड्रग्सविरोधात 'नो टॉलरन्स फॉर ड्रग्स' मोहीम सुरू आहे.
राज्य सहित देशभर में ड्रग्स के खिलाफ ‘नो टॉलरेंस फॉर ड्रग्स’ अभियान शुरू है।
"अल निनो' चे वर्ष आहे. सरासरी पाऊस जरी ९२ टक्के असला तरी दुबार पेरणीची वेळ येऊ नये.कमी पावसात जेवढे जास्त नुकसान टाळता येईल तेवढे टाळण्यास प्रयत्न सुरू आहे." असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
"तसेच इथेनॉलची सर्वात जास्त निर्मिती महाराष्ट्र करतो.त्यामुळे सर्वात जास्त फायदा आपल्या राज्यास होणार आहे. ज्या पकारे केंद्र सरकार इथेनॉलला फ्युएल ब्लेंडिंगमध्ये आणि १०० टक्के इथेनॉल वर. चालणाऱ्या गाड्या याला प्राधान्य दिले जात आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल.
जगातील युद्धजन्य परिस्थितीमुळे एकही देश असा नाही की जिथे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढले नाहीत.निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय होतील."असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)