ऐन भाषणावेळीच मविआची बत्तीगुल!हा कसला संकेत?

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या दिग्गजांसमोर नानांची फजिती

    06-Nov-2024
Total Views | 68

Nana Patole
 
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील वांद्रे येथे महाविकास आघाडीची सभा जाहीर करण्यात आली आहे. ही सभा ६ नोव्हेंबर २०२४ रोज सुरू असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भाषणावेळी तांत्रिक अडथळा निर्माण झाला. यामुळे विधानसभेआधीच नाना पटोले आणि महाविकास आघाडीची बत्ती गुल झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
 
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अशातच आता बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले भाषण सुरू केल्यानंतर विज पुरवठा खंडित झाल्याने एकच नाना पटोले यांची फजिती झाली.
 
यासभेवेळी महाविकास आघाडीचे शिल्पकार शऱद पवार, काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गेसारख्या महाविकास आघाडीच्या दिग्गजांसमोर नाना पटोलेंच्या भाषणावेळी फजिती झाली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराची निर्घृण हत्या झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या झाली असून सध्या या प्रकरणाची बरीच चर्चा आहे. प्रियांशू छेत्री असं हत्या झालेल्या कलाकाराचं नाव आहे. झुंडमध्ये प्रियांशू उर्फ बाबूने लहानशी भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी नागराजने तळागाळातील कलाकारांची निवड केली होती. त्यातीलच एक प्रियांशू होता. त्याने अमिताभ बच्चनसोबतही भूमिका साकारली होती. तो फूटबॉल पटू देखील होता पण कायमच तो गुन्हेगारीमुळे क्षेत्रात वावरत होता. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121