‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची पाचव्या आठवड्यात यशस्वी भरारी

    18-Oct-2024
Total Views | 62
 
Navara Maza Navsacha 2
 
 
मुंबई : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झालेली अगदी तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. पुढे जसजसे सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर येत गेले तसतसे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.
 
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केल असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे. एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा गणपतीपुळेला निघालेला हा प्रवास चित्रपटगृहात सुद्धा चांगली गर्दी करत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121