बॉक्स ऑफिसवर आमीरचा लाल सिंह चड्ढा सपाटून आपटलाय. एकीकडे हा चित्रपट बॉयकॉट करा अशी जोरदार मोहिम सुरु असताना दुसरीकडे लाल सिंह चड्ढा कितीही वाईट असला तरी आम्ही तो पाहणारच असे म्हणत काही मंडळी आमीरच्या या चित्रपटाला आपले समर्थन दर्शवत होते. लाल सिंह चड्ढाला बॉयकॉटचा फटका बसला हे जरी खरे असले तरी त्या चित्रपटात अनेक तांत्रिक चुका होत्या.
लाल सिंह चड्ढाचा चित्रपटाचा कृत्रिम प्लॉट -
लाल सिंह चड्ढा हा फॉरेस गंपचा ऑफिशीअल रिमेक आहे, आणि फॉरेस गंप या सिनेमात एका लो आयक्यू असलेल्या मुलाची गोष्ट उलगडून दाखवलेली आहे, मूर्ख मुलाची नाही. दुसरा अजून एक महात्वाचा मुद्दा म्हणजे या सिनेमात योग योग खूप आहेत, ऑपरेशन ब्लू स्टार सुरू असताना सुवर्णमंदिर परिसराच्या आजू-बाजूला लाल सिंह चड्ढा उपस्थित होता. त्यानंतर इंदिरा गांधींना गोळा घालून ठार केले गेले तेंव्हा सुद्धा त्यांच्या बंगल्याच्या बाजूला लाल सिंह आपल्या आई सोबत होता.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या ८४ सालच्या दंगलीत दिल्लीत एका सरदारजींना गळ्यात टायर घालून दंगेखोरांकडून जाळण्यात आले. योगायोग असा कि त्या सरदारजींवर हल्ला होण्याच्या थोडं आधीच लाल सिंग आणि त्याची आई, त्या सरदारजींंच्या रिक्षातून उतरले. पुढे अडवाणी रथयात्रा, बाबरी मस्जिद अशा सगळ्या ठिकाणी लाल सिंह उपस्थित होता किंवा त्या घटनांचा सिनेमात उल्लेख आहे. फक्त गोध्रा हत्याकांडात अत्यंत क्रूरपद्धतीने कारसेवकांना रेल्वेच्या बोगीत जाळले गेले, तेव्हा तिथे लाल सिंह उपस्थित नव्हता. हा अपवाद सोडल्यास या सिनेमात सगळ्याच मोठ्या राजकीय घटनांंवर भाष्य केले गेले आहे.
त्यामुळे लाल सिंह चड्ढाचा काही प्लॉट हा सलमान खानच्या भारत सिनेमावरून उचललाय का असा प्रश्न पडतो. कारण भारत या सलमानच्या सिनेमात देखील भारत नावाचे पात्र आणि भारताच्या घडामोडी यांचा एकमेकांशी संबंध जोडला आहे. फोरेस्ट गंप मध्ये अशा कोणत्याही गोष्टी ओढून ताणून दाखवलेल्या नाहीत. फॉरेस्ट गंपची मांडणी अत्यंत नैसर्गिक आहे. त्यामुळे ओढून ताणून राजकीय भाष्य करण्याच्या नादात लाल सिंह चड्ढा फसलाय असे ठळकपणे दिसून येते.
आमीरच्या अभिनयाचा एकसुरीपणा -
इतरांप्रमाणे भारंभार चित्रपट प्रदर्शित न करता आमीर वर्षातून एखादा किंवा काही वेळेला २-३ वर्षातून एखादा चित्रपट प्रदर्शित करतो. तो आपल्या भूमिकेसाठी विशेष प्रोसेस करतो,खूप मेहेनत घेतो. स्क्रिप्टच्या बाबतीतसुद्धा तो खूपच चोखंदळ असतो. गेल्या काही वर्षात त्याने वेगवेगळ्या विषयांची सिनेमांच्या माध्यमातून हाताळणी केलेली आहे. एकंदरीतच आमीर हा बॉलीवूडचा मिस्टर पेर्फेक्षनिस्ट म्हणून ओळखला जातो.
पण हल्ली तो त्याच्या एकाच प्रकारच्या अभिमनयाच्या पॅटर्नमध्ये अडकलाय असं म्हणव लागेल. गजनी, थ्री इडीयट,पिके या त्याच्या मागच्या काही चित्रपटांत एकाच धाटणीचा अभिनय केल्याचे आढळून येते. सध्याच्या लाल सिंह चड्ढा आणि पिके या दोन्ही चित्रपटात भुवया उडवणे, डोळे वटारणे, इतर एक्सप्रेशन बॉडी लॅंगवेज यात फारसा फरक नाही. त्यामुळे या सिमनेमात आमीरच्या मोनोटोनस अभिनयाकडे प्रेक्षकांना पाठ फिरवली.
स्क्रिप्टमधील तांत्रिक अडचण -
फोरेस्ट गंप या चित्रपटात व्हिएतनाम युद्धावर गंप जातो आणि तिथे त्याच्याच सारखा लो आयक्यू असलेला एक मित्र त्याला भेटतो. अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अपुऱ्या मनुष्यबळ मुळे एक लाख फिजिकली आणि मेंटली अनफिट सैनिकांची भारती खरोखर करण्यात आली होती. अमेरिकेचे तत्कालीन डिफेन्स सेक्रेटरी रॉबर्ट मॅकनमारा यांनी तसा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्या एकलाख सैनिकांना मॅकनमारा इडीयट असे संबोधले जायचे.
या सत्यकथेचा फॉरेस गंप सिनेमात वापर केला आणि त्या लॉजिकने गंप अमेरिकेच्या लष्करात सामील झाला असे दाखवण्यात आले आहे. पण स्वतःला मिस्टर पेर्फेक्षनिस्ट म्हणवून घेणाऱ्या आमीर ने लाल सिंह चड्ढा हे लो आयक्यू असलेले पात्र सिनेमात कोणत्या लॉजिकने लष्करात भरती होते हे दाखवलेच नाही. कारण भारतीय लष्करात लो आयक्यू असलेल्या व्यक्तीचा लढाऊ सैनिक म्हणून समावेश केला जात नाही असा कोणताही.
त्याही पुढे जाऊन दहशदवाद्यां मधील मानवतेचं दर्शन घडवण्यासाठी एका अतिरेक्याला लाल सिंह वाचवतो आणि आर्मी सुद्धा त्याला आपलाच माणूस मानते. पुढे त्या दहशदवाद्याचे लाल सिंह बरोबर राहून हृद्य परिवर्तन होते, मग तो सुधारतो वगैरे अशी अनाकलनीय गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे.
हा सीन पाहताना मला अजमल कसबची आठवण झाली. २६-११ च्या हल्याच्या रात्री ज्या माणसाने कासाबला पाणी पाजले होते त्या माणसालाच त्या सैतानाने गोळ्या घालून ठार मारले होते. त्यामुळे लाल सिंग चड्ढामध्ये दहशदवाद्यांचा मानवतेचा चेहेरा वगैरे दाखवण्यासाठी आमिर का धडपडतोय असा प्रश्न पडतो. क्रिएटीव्ह लिबर्टीच्या नावाखाली इंडियन आर्मीबद्दल चुकीची गोष्ट दाखवली आहे.
रटाळ स्क्रीन प्लेमुळे प्रेक्षक आणि सिनेमाची नाळ तुटली -
लाल सिंग चड्ढाकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या कारण ही फिल्म फॉरेस्ट गंपचा ओरीजनल रिमेक आहे. फॉरेस्ट गंप सिनेमात देखील गंप आपल्या आयुष्याची गोष्ट आजूबाजूच्या लोकांना नॅरेट करून सांगत असतो आणि त्यातून सिनेमा पुढे सरकतो पण ओरीजनल फिल्म मध्ये सीनच्या मधलं नॅरेशनकमी आहे दिग्दर्शक सीनच्या माध्यमातून काही गोष्टीची उकल करतो लाल सिंग चड्ढात मात्र तसे होत नाही सीनच्या मधल्या काही गोष्टी सुद्धा ज्या सीनच्या माध्यमातून सांगता आल्या असत्या त्या लाल सिंह प्रेक्षकांना नॅरेट करून सांगतो जे अत्यंत रटाळवाणे आहे. ज्यामुळे लोकांचे लक्ष सिनेमापेक्षा हातातील पॉपकोर्न चाघळण्याकडे जास्त जाते.
लाल सिंह चड्ढाच्या खूप आधीच फोरेस्ट गंप भारतीय सिनेमात येऊन गेलाय -
बॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फरान अख्तर याचा लक्ष नामक हिंदी सिनेमा २००४ साली प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेता ह्रितिक रोशनने करन शेरगिल नावाच्या एका मुलाची भूमिका केली होती, सिनेमात करनच्या आयुष्यात कोणतेही ठोस ध्येय नसते. त्यामुळे त्याची मैत्रीण त्याच्यापासून दुरावते आणि शेवटी कारगिल युद्धाच्या रूपाने त्याच्या आयुष्यात एक ध्येय सापडते.
दुर्दैवाने हा सिनेमा देखील म्हणावा तसा बॉक ऑफिसवर जादू करू शकला नाही. पण लक्ष हा एक उत्तम सिनेमा होता. आणि या सिनेमावर फॉरेस गंपचा बराच प्रभाव होता असे म्हणावे लागेल. म्हणजे लक्ष पाहताना तसे जाणवते. त्यामुळे लाल सिंग चड्ढाच्या खूप आधी फॉरेस्ट गंप भारतीय सिनेमात येऊन गेलाय. त्यामुळे लाल सिंग चड्ढात आमीर काय वेगळ दाखवणार असा प्रश्न अनेक सिने रसिकांनी सोशल मिडीयावर खूप आधीपासूनच उपस्थित केला होता. आता सिनेमा प्रदर्शित झाला आणि आमीरने प्रेक्षकांच्या किमान अपेक्षा देखील पूर्ण न करू शकल्याने लाल सिंह चड्ढा तिकीटबारीवर सपाटून आपटला.