हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम येत्या ७ दिवसात सुरु करावे अन्यथा आंदोलन करू

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा इशारा

    09-Nov-2021
Total Views |



गिरीश बापट _1  
 
 
 

पुणे : हिंजेवाडी आयटी पार्क ते पुण्यातील शिवाजीनगर दरम्यान असलेल्या पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा पुण्याचे लोकसभा खासदार गिरीश बापट यांनी दिला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त सुहास दिवसे यांची गिरीश बापट यांनी नुकतीच भेट घेतली त्या वेळेज गिरीश बापट यांनी हा आंदोलनाचा इशारा दिला. हिंजेवाडी आयटी पार्कला अनेक माहिती तंत्रद्यान क्षेत्रात काम करणारे लोक प्रवास करत असतात. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेची सुरुवात येथूनच होणार आहे. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होण्यास विलंब झाल्यास लोकांना ह्या मेट्रो सेवेचा फायदा हव्या तेवढ्या लवकर उठवता येणार नाही .

त्यात आता हिंजेवाडी आयटी पार्क ते शिवाजीनगर दरम्यानच्या मार्गावरील मेट्रोचे काम सुरु करण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या वेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले कि, ''या प्रकल्पासाठी सर्व प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत. 98 टक्के जमीनीचे अधिग्रहण झाले असूनही काम मात्र सुरू झालेले नाही. पुणे मेट्रोच्या ह्या तिसऱ्या मार्गाच्या प्रकल्पाला विलंब झाल्यास प्रकल्पाची किंमत वाढेल; जी शेवटी नागरिकांनाच आणि प्रशासनालाच भरावी लागणार आहे.

येत्या आठवड्याभरात हे काम सुरु न झाल्यास पुणे भाजपच्या माध्यमातून पीएमआरडीए आणि राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल''. तसेच बेमुदत उपोषणाचा इशाराही त्यांनी या वेळेज दिला. ''ह्या मेट्रोप्रकल्पासाठी लागणारी जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली असून येत्या चार दिवसात ह्या मार्गावरच्या मेट्रोचे काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन या वेळेज पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी दिले. या वेळीज गिरीश बापट यांच्यासह शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, अमोल बालवाडकर, आदित्य माळवे, आणि ज्योती कळमकर आणि मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.