तिसरी कक्षाही पार, प्रतीक्षा फक्त ११ दिवसांची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019
Total Views |

 



श्रीहरीकोटा: महत्वपूर्ण आणि अवघड असा टप्पा चांद्रयान २ने यशस्वीरीत्या पार केला आहे. चांद्रयान २ने आज सकाळी चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला. २१ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताच विक्रम लँडरने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो इस्रोने प्रसिद्ध केला. सोमवारी यानाने टेरेन मॅपिंग कॅमेराने घेतलेली काही छायाचित्रे पुन्हा प्रसिद्ध केले. यामध्ये पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्रावरील विवरांचा समावेश करण्यात आला होता. इस्रोने आज सकाळी ट्विट करत यानाच्या यशस्वी तिसऱ्या टप्प्याची माहिती दिली. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार  यानाने आज सकाळी ९ वाजून ०४ मिनिटांनी चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. चांद्रयान २ चा प्रवास योग्यरितीने सुरु असून आता चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्यासाठी फक्त ११ दिवसांची प्रतीक्षा आहे.







श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून २२ जुलै रोजी चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. चांद्रयान २ आणखी १ कक्षा पार करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल. ७ सप्टेंबर रोजी लॅडर विक्रम त्याच्या ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर लॅडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमीनीवर उतरेल. चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर ६  चाकाचे रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळ होईल. यासाठी 4 तासांचा वेळ लागेल. हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राच्या भोवती फिरणार होते. पण आता त्याचा कालावधी वाढवून दोन वर्ष करण्यात येणार आहे. चांद्रयान २ वरील टीएमसी उपकरणाद्वारे चांद्रयान १ चे उर्वरित काम पूर्ण केले जाईल आणि चंद्राचा हाय रिझोल्यूशन थ्रीडी नकाशा तयार करण्यात येईल.

 

@@AUTHORINFO_V1@@