आता बिनधास्त काढा इतर बॅंकांच्या एटीएममधून पैसे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |



पुढील महिन्यात होणार 'हा' बदल


नवी दिल्ली : इतर बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर लागणाऱ्या शुल्कापासून आता ग्राहकांची सुटका होण्याची शक्यता आहे. एनईएफटी आणि आरटीजीएसच्या व्यवहारांवरील शुल्क रद्द केल्यानंतर रिझर्व्ह बॅंक आता इतर बॅंकेच्या एटीएममधून काढल्या जाणाऱ्या रक्कमेवरील शुल्कात कपात करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एका अहवालानुसार, येत्या महिन्यात या शुल्ककपातीची घोषणा केली जाऊ शकते.

 

लवकरच होणार अंमलबजावणी

एटीएममधून रक्कम काढल्या जाण्याच्या शुल्काचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला असून लवकरच तो आरबीआयकडे सुपूर्द केला जाणार आहे. या समितीने एटीएमच्या व्यवहारांवरील ठराविक शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. गेल्या काही काळात एटीएमच्या वाढत्या वापरामुळे झालेल्या शुल्कवाढीचाही अभ्यास या अहवालात करण्यात आला आहे.

 

ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर आकारले जाते शुल्क

सद्यस्थितीत बॅंकेकडून एटीएमच्या ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारणी केली जाते. प्रत्येक बॅंकेने त्याबद्दलची सूचना ग्राहकाला दिलेली असते. त्यानंतर प्रत्येक व्यवहारांवर वेगळे शुल्क लागू करते. मेट्रो शहरांमध्ये याची मर्यादा तीन व्यवहार इतकी तर ग्रामीण भागांत त्याची मर्यादा ५ इतकी आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर किमान २० रुपये शुल्क आकारणी केली जाते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@