'नमामि चंद्रभागा' माहितीपटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

    12-Jul-2019
Total Views | 35



पंढरपूर : 'नमामि चंद्रभागा' प्रकल्पावर निर्मित माहितीपट व लघुपटाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात झाले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहिती आणि लघुपटांची निर्मिती करण्यात आली आहे.

 

माहितीपटात भीमा नदीचे महात्म्य सांगण्यात आले असून पुढे पंढरपूर येथे ही नदी चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे नदीचे पावित्र्य राहिले नाही. त्यासाठी आपण सर्वांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा संदेश देण्याचा प्रयत्न या माहितीपटात करण्यात आला आहे.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पालकमंत्री विजय देशमुख आदी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121