धक्कादायक : कॉमनवेल्थ गेम्समधून नेमबाजी हटवली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2019
Total Views |


नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांसाठी पर्वणी ठरणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समधून नेमबाजीचा स्पर्धा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२२मध्ये बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या स्पर्धेतून नेमबाजीचा स्पर्धा हटवण्यात आली आहे. भारतीय नेमबाजांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाज नेहमी पदकांची लयलूट करत असतात.

 

"नेमबाजीचे स्थान कॉमनवेल्थमध्ये अढळ राहावे म्हणून भारताने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण आयोजन समिती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती." अशी माहिती सचिव राजीव भाटीया यांनी दिली. नेमबाजीचा या स्पर्धेतून हटवल्यामुळे भारताच्या पदकतालिकेतील स्थानावर याचा परिणाम होईल. तसेच, भारतीय नेमबाज एका मोठ्या व्यासपीठाला मुकणार आहेत, अशी चिंता जाणकारांकडून करण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@