आंदोलनकर्त्यांचा लखनऊमध्ये हिंसाचार

    19-Dec-2019
Total Views | 37
एएए_2  H x W: 0

 

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात केलेल्या आंदोलनाने हिंसाचाराचे रुप घेतले. लखनऊतील बऱ्याच भागात हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. या उपद्रवादरम्यान दोन पोलीस चौक्या जाळल्या आहेत. तसेच बाहेर उभ्या असणाऱ्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी पोलीसांवरही दगडफेकही करण्यात आली.

 

अनेक ठिकाणी तोडफोड व आगी लावण्याच्या घटना घडल्या. जमावाला पांगवण्यासाठी डालीगंज आणि हजरतगंजमध्ये पोलीसांना लाठीचार्ज व अश्रूधुर सोडावा लागला. लखनऊमध्ये प्रसारमाध्यमांची ओबी व्हॅनही जाळण्यात आली. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पोलीस आणि प्रदर्शनकर्त्यांमध्ये झटापट झाली. या ठिकाणची इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

 

एएए_4  H x W: 0

डालीगंज भागात नागरिकत्व विधेयकाला विरोध करताना दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. ठाकुरगंजमध्ये गोळीबार करण्यात आला. या प्रकारात कुठलीही नुकसानीची घटना घडलेली नाही. आंदोलनकर्त्यांनी मदेयगंज आणि ठाकूरगंज या भागातील पोलीस चौकी भस्मसात झाल्या. त्यानंतर कित्येक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. यापूर्वी लखनऊ येथे सप आणि काँग्रेसच्या नेत्यांना विरोध करताना अटक करण्यात आली.


 

विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढुन त्यांनी आंदोलन केले. केडी सिंह बाबू मेट्रो स्थानकही हिंसाचारामुळे बंद करण्यात आले. काँग्रेस नेते अजय कुमार लल्लू यांच्यासह अनेक नेत्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. प्रदर्शनादरम्यान, हजरतगंज, निशांतगंज पुल, हनुमान सेतू रस्ता रोको केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121