डेव्हिड वॉर्नरची दमदार त्रिशतकी खेळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |



अ‍ॅडलेट : अ‍ॅडलेट येथील ओव्हल मैदानावर पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने खणखणीत त्रिशतक ठोकले आहे. गुलाबी चेंडूवर त्याने हे त्रिशतक झळकावले. पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.

दिर्घकाळानंतर फॉर्ममध्ये परतलेल्या डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. याआधी अ‍ॅशेस मालिकेत अपयशी ठरलेल्या वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्वत:ला सिद्ध केले. कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करत वॉर्नरने इतिहास घडवला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५५० धावांचा डोंगर उभारला आहे. वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकाचा त्यात समावेश आहे. त्याने हे त्रिशतक ३८९ चेंडूंमध्ये पूर्ण केले. त्यात ३७ चौकारांचा समावेश आहे. त्याने १२० षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून दिमाखात हे त्रिशतक साजरे केले. ३३५ धावांवर तो नाबाद राहिला.

पाकिस्तानविरुद्धच्या त्रिशतकी खेळीच्या आधी कसोटीमध्ये वॉर्नरने २५३ धावांची खेळी होती. ही खेळी त्याने न्यूझीलंडविरुद्ध २०१५मध्ये पर्थ येथे केली होती. अ‍ॅडलेट मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. त्यांनी ८८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९३१-१९३२ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानावर २९९ धावांची खेळी केली होती.

@@AUTHORINFO_V1@@