कोपर्डी प्रकरण; सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी 'यांची' निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |


 

 

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि खून खटला सध्या मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात चालू आहे. या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँडव्होकेट उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर जिल्हा पोलिस प्रशासनाने शिफारस केल्यानंतर विधी व न्याय विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता या खटल्यात यादव-पाटील हे सरकारी पक्षाच्यावतीने बाजू लढविणार आहेत.

 

काय आहे प्रकरण?

 

कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी घडलेल्या या बलात्कार आणि खून घटनेने संपूर्ण देश हादरला होता. १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात उघडकीस आली होती. यानंतर राज्यभरात मोठं-मोठे मूक मोर्चे काढून आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर यावर अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. यात तीनही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान, या निकालाविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असून यावर सुनावणी बाकी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


@@AUTHORINFO_V1@@