वीज बचतीचा ‘जळगाव पॅटर्न’ देशभरात लागू होणार!

    12-Jun-2018
Total Views | 18

सरकारी कंपनीच्या माध्यमातून शहरात लागणार १६ हजार एलईडी

 
जळगाव, १२ जून :
अमृत अभियानांतर्गत निधीवाटपासाठी निवड झालेल्या सर्व शहरांतून वीजबचतीचा ‘जळगाव पॅटर्न’ लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जळगावमध्ये लवकरच एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस या सरकारी कंपनीच्या माध्यमातून १६ हजार एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. यामुळे वर्षभरात १ कोटी ८६ लाख रुपयांची बचत वर्षाकाठी होणार आहे.
 
 
मुख्यमंत्र्यांनी जळगावसाठी मंजूर केलेल्या २५ कोटींतून सुरुवातीला रस्त्यांचीच कामे करण्याचे पालिका वर्तुळाने घाटलेले होते, पण कैलास सोनवणे यांनी हा घाट उधळून लावला होता. ते एकटे निधीच्या अशा वापराच्या विरोधात होते. अखेर राज्य सरकारने रस्त्यांच्या कामांना मनाई केली. सोनवणे यांनी पालिकेच्या सभागृहात नुसताच विरोध नोंदवला नाही, तर या निधीचा विनियोग कसा करावा, याबाबत पालिकेला आणि शासनालाही वारंवार सूचना केल्या. जळगावातील वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा तंत्रातील फेरबदलासाठी हा निधी वापरावा, अशी मौलिक सूचना त्यांनी केली आणि सतत पाठपुरावा केला. वीजपुरवठ्याअंतर्गत एलईडी तंत्र वापरल्यास पालिकेचा वीजबिलापोटी खर्च होणारा प्रचंड पैसा दरवर्षी वाचेल आणि त्या पैशांनी पुढे रस्त्याची कामे होत राहतील, असे ठासून सांगितले. मुंबई येथील विद्युत अभियंता सुभाष देशपांडे, जळगाव बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (एसएसबीटी) प्रा. संजय शेखावत, प्रा. मुज्ताहिद अन्सारी या उर्जाबचत क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन एक सविस्तर अहवाल तयार करून घेतला.आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच राज्याचे प्रधान सचिव यांच्यापर्यंत आपले म्हणणे सातत्याने मांडले. मुख्यमंत्र्यांनाही कळवले. अखेर जळगाव पालिकेला एलईडीबाबत शासनाकडून सूचना करण्यात आल्या. पालिकेने १० कोटींची तरतूद त्यासाठी केली आहे.
 
 
सरकारी कंपनी करणार १० कोटी खर्च
आता नव्या निर्णयानुसार मात्र ही रक्कम पालिकेला खर्च करावी लागणार नाही. ईईएसएल कंपनीच खर्च करणार असून, पुढील सात वर्षे देखभालही करणार आहे. त्यासाठी महापालिकेने कंपनीसोबत करार करावा, असे सरकारने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. नव्या तरतुदींनुसार विजेच्या बचतीतून कंपनी आपला खर्च वसूल करणार आहे.
 
जळगाव महापालिका
* १६ हजार ७३ जळगावातील सध्याचे पथदिवे
* २५ ते ३० लाख रुपये वीजबिलापोटी दरमहा खर्च
* ७ ते १० लाख रुपये मनपा कार्यालयांचे मासिक वीजबिल
वीज वापर : महाराष्ट्र स्थिती
३ हजार २३२ दशलक्ष युनिट
एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत सार्वजनिक सेवेवर झालेला वीज वापर.
४० टक्के होईल बचत
एलईडी तंत्राचा करावा लागणार वापर.नव्या तंत्रात सेंसर असून सूर्यप्रकाश येताच लाइट आपोआप बंद होतील. बचत होणारी वीज शेतीकडे वळवता येईल.
‘मी आणि माझा वॉर्ड’ या संकुचित भावनेतून बाहेर पडत ‘मी आणि माझे शहर’ अशी व्यापकता आम्ही आणली आणि पुढे ती ‘मी आणि माझे राज्य’ नंतर ‘मी आणि माझा देश’, अशी विस्तारत गेली. एलईडी तंत्राच्या वापराचा जो पाठपुरावा मी केला, त्याची ही अशी फलश्रुती निश्चितच आनंद देणारी आणि आश्वस्त करणारी आहे.’
-  कैलास सोनवणे, माजी नगरसेवक, जळगाव
अग्रलेख
जरुर वाचा
पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी वसईच्या शिवालयात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर येथील शिवालयात भोळ्या महादेवाच्या पिंडीवर पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती.यातील प्राचीन मंदिरांपैकी तुंगार अरण्यातील ईश्वरपुरी च्या निसर्गरम्य आत्मलिंगेश्वर मंदिरात व भालीवली येथील जागृत महादेव वृंदावन टेकडी मंदिरात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते .याचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.या भंडाऱ्यात उपवासाला चालणारे पदार्थही होते.अगदी संध्याकाळ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121