जलबचतीचा संदेश देणार्‍या दिंडीने जलसप्ताहास प्रारंभ

    23-Mar-2018
Total Views | 37
 

 
 
जळगाव :
जैन इरिगेशन सिस्टीम्स्, भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधी रिसर्च फाउंडेशन व तापी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिनानिमित्त आयोजित जलसप्ताहाची सुरुवात जलदिंडीने झाली.
 
 
महात्मा गांधी उद्यानापासून जलदिंडीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. याप्रसंगी जलप्रतिज्ञा व कलशपूजन झाले. उपमहापौर गणेश सोनवणे, संघपती दलिचंद जैन, तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर व जैन इरिगेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी व सहकारी उपस्थित होते. जलदिंडींचा समारोप भाऊंचे उद्यान येथे झाला.
 
 
दिंडीत जल बचतीचा संदेश देणारी आरास होती. ए. टी. झांबरे विद्यालयाचे लेझीम पथक होते. अनुभूती इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पावली नृत्य केले. सेंट जोसेफ स्कूलचे स्केटिंग पथक जलदिंडीमध्ये आकर्षण ठरले. शिरसोली येथील संत रूपलाल महाराज भजनी मंडळानेही लक्ष वेधून घेतले. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, रूस्तमजी स्कूल, पर्यावरण शाळा, जैन स्पोर्टस् अकादमी, सकल जैन श्री संघ, जैन नवयुवक मंडळ, युवाशक्ती फाऊंडेशन, नीर फाउंडेशन, परिवर्तन, रोटरी जळगाव ईस्ट, लायन्स क्लबने सहभाग घेतला.
 

पोस्टर प्रदर्शन - भाऊंच्या उद्यानामध्ये आयोजित पोस्टर्स प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संघपती दलिचंद जैन, तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, डॉ. किसन पाटील, गौरी राणे उपस्थित होते. जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांनी जलबचत, जलसाक्षरतेच्या संकल्पनांवर ५८ पोस्टर्स साकारली आहेत. प्रदर्शनात संत व महापुरूषांचे जलसंवर्धनाचे विचार मांडण्यात आले. सूत्रसंचालन दिनेश दीक्षित यांनी केले. दीपक चांदोरकर यांनी पसायदन म्हटले.

 
आज परिसंवाद
भाऊंच्या उद्यानात २३ रोजी, संध्याकाळी ६ वाजता पाणी परिसंवाद होणार आहे. परिसंवादावेळी औरंगाबाद विभागाचे माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील हे प्रमुख पाहुणे असतील. परिसंवादामध्ये लोकसहभागातून जल समृद्धी यावर तापी महामंडळाचे पी. पी. वराळे, डॉ. धनंजय नेवाडकर, डॉ. हेमंत पाटील, वर्धमान भंडारी सहभागी होतील. सुप्रसिद्ध शिल्पकार निरंजन शेलार हे पाण्याबाबत शिल्प साकारणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121