मुलांना संस्कारी बनवा : चंद्रकांत मोरे

    17-Dec-2018
Total Views | 56

चाळीसगाव : 
 
आजच्या पिढीत आई-वडील मुलांचे लाड खूप पुरवतात, परंतू प्रेम कमी होत चालले आहे. मुलांमध्ये व पालकांमध्ये संवाद महत्वाचा आहे. शाळेतील मुलांना आज समजून घेणे गरजेचे आहे.
 
 
त्यांना मार्क कमी पडले तरी चालले, परंतू मुल संस्कारी होण्यासाठी त्यांच्यावर अध्यात्मीक संस्कार करा. असे आवाहन ग्राम अभियान सत्संग सोहळ्यात येथे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे चंद्रकांतदादा मोरे यांनी केले.
 
 
चंद्रकांतदादा मोरे यांचा जळगाव जिल्ह्यातील ग्राम अभियांन दौर्‍याची सांगता चाळीसगाव येथे गुरुवारी झाली. यावेळी हिरापूर रोड जवळील श्री स्वामी समर्थ केंद्रांत आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते. स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख तात्या भोसले, डॉ.संजय देशमुख आदि उपस्थित होते.
 
 
पुढे बोलतांना चंद्रकात मोरे म्हणाले की, स्वामी समर्थांचे कार्य देश-परदेशातली सहा हजार केंद्राच्या माध्यामातून चालू आहे. येथे जात-पात, धर्म, गरीब-श्रीमंत, पुरुष-महिला असा कुठलाही भेदभाव नाही.
 
 
जगाच्या कल्यानासाठी स्वामी समर्थ महाराज आजही कार्य करत आहेत. त्यामुळे जिथे सर्व असमर्थ, तिथं स्वामी समर्थ असल्याचे सांगत त्यांनी आतापर्यंत दिडोरी प्रणीत केंद्रांच्या वाटचालीचा व स्वामी समर्थ अध्यात्मीक मार्गाचा थोडक्यात इतिहास सांगीतला.
 
 
ते म्हणाले की, बालसंस्कार ही काळाची गरज आहे. मरते वेळी मुले जवळ नसतील तर आपल्या जिवनाच काय उपयोग आहे. आज लोक शिकुण देखील अशिक्षीत आहेत. डॉक्टर, शिक्षक, एनआरआय, प्राध्यापक व उच्च पदावर नोकरी करणार्यांची आई-वडीलच आज वृध्दाश्रमात आहेत.
 
 
परंतू कष्ट करणारा शेतकरी संस्कारी असलल्यामुळे त्यांचे आई-वडील तुम्हाला वृध्दाश्रमात दिसत नाहीत. त्यामुळे मुलांना कष्ट करण्याबरोबरच संस्कारी बनविण्यासाठी अध्यात्मीक बनवा. पुढे त्यांनी केंद्र, सेवेकरी, नित्यसेवा, पंचमहायज्ञ, सामुद्रीशास्त्र व वास्तूशास्त्राबाबत प्रबोधन केेले.
 
 
गाय वाचली तर सृष्टी वाचले-यावर बोलतांना ते म्हणाले की, पूर्वी दुष्काळ होता, आतापेक्षा जास्त कठोर काळ त्यावेळेस होता. परंतू त्याकाळात एकेही शेतकरी आत्महत्या करत नव्हता, त्यांचे कारण म्हणजे शेतकरी गो-पालना बरोबरच सेंद्रिय शेती करायचे. गो-पालनांचे अनेक फायदे आहेत.
 
 
गोमुत्र पिल्यावर कॅन्सर होत नाहीत, शेण, दुध, दही अशा अनेक उपयोगी गोष्टी गायीपासून मिळतात. त्यामुळे गो-पालनावर भर दिला पाहिजे देशी गाय वाचली तरच सृष्टी वाचले असेही त्यांनी स्पष्ट केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121