गोरेगावमध्ये म्हाडाची पाच हजार घरे !

    11-Dec-2018
Total Views | 30
 

मुंबई ः म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीची सोडत १६ डिसेंबर रोजी निघणार आहे. मात्र, म्हाडाचा सर्वात महत्वकांशी आणि मोठा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हाडाचा घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई उपनगारातील पहाडी, गोरेगाव येथे विविध उत्पन्न गटांसाठी सुमारे पाच हजार सदनिकांचा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. मुंबई मंडळातर्फे या गृहप्रकल्पाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. नजीकच्या भविष्यातील हा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प गृहप्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.

 

पहाडी गोरेगाव, बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम या ठिकाणी सुमारे १८ एकर परिसरात उभारण्यात येणारा हा गृहप्रकल्प आणि , अशा दोन जागांमध्ये विभागण्यात आला आहे. सुमारे ४१ हजार ६१४ चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड '' वर हजार ९५० सदनिका उभारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यातील हजार ६६५ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ५५५ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, ४१७ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, ३१३ सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. २९ हजार ७४० चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड ''वर सुमारे हजार १०९ सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यातील हजार १९० सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ३९७ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, २९८ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, २२४ सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी असतील.

 

गेल्या २५ वर्षांपासून म्हाडाच्या नावे असलेली ही २५ एकर जमीन न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. कुसुम शिंदे या महिलेने या जागेवर आपला हक्क बजावत न्यायालयात दाद मागितली होती. ही जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची असून या जमिनीवर म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकरिता गृह योजना राबविण्याकरीता संपादित करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात या महिलेने सदरील भूखंड एका विकासकाला विकला. या पार्श्वभूमीवर या खटल्याने शहर दिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा प्रवास तब्बल पंचवीस वर्षे केला. हा प्रकल्प येत्या तीन वर्षात पुन्हा होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121