समान निधीची मुद्यांपासून सभेत गदारोळ

    29-Nov-2018
Total Views |

४९ जि.प.सदस्यांनी स्वाक्षरीचे दिले पत्रक, पुन्हा केला विरोध

 
जळगाव :
जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत समान निधीच्या मुद्यावरून चांगलाच गोंधळ झाला. शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांसह भाजपाच्याही सदस्यांनी या मुद्याला पाठिंबा दिल्याने सभेत गदारोळ झाला. समान निधीच्या मुद्यावर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यामुळे जि.प.अध्यक्षांनी केलेले नियोजन अमान्य असल्याचे यातून स्पष्ट जाणवले.
 
 
समान निधीच्या मुद्याला भाजपाच्या १८, राष्ट्रवादीच्या १७ शिवसेनेच्या १३ सदस्यांनी स्वाक्षरीसह पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे जि.प.अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांची गोची झाली आहे. त्यामुळे जि.प.च्या पदाधिकार्‍यांना समान निधीच्या मुद्यावर पुन्हा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने सदस्यांनी निधी नियोजन अमान्य असल्याचे स्वाक्षर्‍यांसह पत्रच दिले आहे. अर्थसंकल्पीय निधी नियोजनाचा विषय नामंजूर करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. परिणामी जि.प.अध्यक्षांसह प्रशासनाची अडचण झाली आहे. कारण निधीचे नियोजन करून जि.प.च्या काही गटात कामाचे वितरण करून कामासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे नियोजनानंतर व काम वाटपानंतर हा विषय नामंजूर करता येणे कितपत शक्य आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लवकरच आचारसंहिता काळात पुन्हा कामांना ब्रेक लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील निधी नियोजनाचा तिढा सुटून नसल्याचा प्रत्यय पुन्हा जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आला. शिवसेनेचे नाना महाजन, जयपाल बोदर्डे, शशिकांत साळुंखे, प्रताप पाटील, रवींद्र सूर्यभान पाटील, पल्लवी सावकारे यांनी याबाबत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. समाननिधी वगळता इतर काही विषय सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
 
 
सभेला जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अर्थ-शिक्षण, समिती सभापती पोपट तात्या भोळे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, सभापती प्रभाकर सोनवणे, सभापती रजनी चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी उपस्थित होते.
 
 
औषध खरेदीचा विषय गाजला
जि. प. च्या आरोग्य विभागाने खात्याचे सभापती व आरोग्य समितीच्या सदस्यांना विश्‍वासात न घेता औषध खरेदी केल्याचे नियोजन केल्याचा मुद्दा सदस्य नीलिमा पाटील यांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्या रकमेच्या औषधांची खरेदी परस्पर झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गतवर्षांप्रमाणे नियमाप्रमाणे औषध खरेदीचा विषय मांडण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर यांनी यावेळी सांगितले.
 
 
जि.प.ची सुरक्षा वार्‍यावर : नाना महाजन
जिल्हा परिषदेत पाणीप्रश्‍नांबाबत महिनाभरात दोनदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण जिल्हा परिषदेत कुणालाही सहज प्रवेश मिळत असल्याने अशा घटना घडतात. यामुळे जिल्हा परिषदेची सुरक्षा वार्‍यावर असल्याचा मुद्दा नाना महाजन यांनी उपस्थित केला.
 
सिंचन अभियंत्यांना धरले धारेवर
साकरी येथील सिंचन तलावातील उत्खनन करण्याचा ठराव नामंजूर असताना त्यांचे उत्खनन कसे होत आहे? असा प्रश्‍न पल्लवी सावकारे यांनी उपस्थित करीत लघुसिंचनाचे कार्यकारी अभियंता नाईक यांना धारेवर धरले.
 
शाळांना वीजबिल भरण्याची मागणी
ग्रामपंचायतीला २५ टक्के शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक असताना त्यावर मात्र तो खर्च होतो का? असा मुद्दा लालचंद पाटील यांनी उपस्थित केला. शाळेचे वीजबिल लातूरप्रमाणे ग्रामनिधीतून भरले आहेत. त्याप्रमाणे शाळांचे बिल भरण्याची मागणी पाटील यांनी केली. याबाबत संयमाचा अंता पाहू नये, असा इशारा पाटील यांनी दिला. पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत एसटी महांमडळाचे अंतर ग्राह्य धरण्याचा ठराव झालेला असताना गुगल मॅपचा वापर का करण्यात आला, असा मुद्दाही पल्लवी सावकारे यांनी उपस्थित केला. त्यावर शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे यांनी ठरावाप्रमाणे हे विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121