धरणगाव :
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी साईनाथ शरद कासार यांची ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून न्यूटन भाभा या संशोधन फेलोशिपमध्ये निवड झाली आहे.
ब्रिटिश कौन्सिल हे प्रत्येक वर्षी न्यूटन भाभा या नावाजलेल्या संशोधन फेलोशिपसाठी संपूर्ण भारतातून संशोधन प्रकल्प मागवतात. त्यात हजारो संशोधन प्रकल्पातून 50 प्रकल्पांची निवड करण्यात येते.
त्यात निवडलेल्या संशोधकात साईनाथ कासार यांचीही निवड झाली आहे. साईनाथ कासार यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी न्यूकास्टल युनिव्हर्सिटी, न्यूकास्टल युनिव्हर्सिटी, न्यूकास्टल अपॉन टायने युनायटेड किंगडम (यू.के.) येथे जाण्याची संधी मिळाली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, बी. आर. महाजन, प्रसाद कासार, कासार समाजाचे सचिव सागर कासार, आत्माराम चौधरी, अरविंद चौधरी, साईनाथची आई शारदा कासार व बहीण प्रा. पूनम कासार उपस्थित होते.