मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता दिवस घालवायची गरज नाही किंवा जास्त पैसे खर्च करायची गरज नाही. कारण केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सबाबत काही नवीन नियम आणि योजना आणल्या आहेत. या योजनेनुसार आता फक्त ३५० रुपये खर्च करून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स आता घरपोचही देण्यात येणार आहेत. आपल्या लायसन्ससाठी शहरातील आरटीओ ऑफिसमध्ये ऑनलाईन अर्ज करा.
कशी असेल प्रक्रिया?
- https://parivahan.gov.in/ या साईटवर लॉग इन करा.
- त्यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स विभागाला क्लिक करा.
- त्यानंतर दिलेल्या सर्व प्रक्रियेनुसार आपला अर्ज भरा.
- त्यानंतर वेडसाइटवर दिलेल्या प्रक्रियरनुसार ३५० रुपये भरावे.
- या प्रक्रियेनंतर तुम्ही साइटवर दिलेल्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची तारीख, ठिकाण आणि वेळ कळविण्यात येईल.
- या सर्व प्रक्रियेनंतर १५ दिवसांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स दिलेल्या पत्त्यावर घरपोच होईल.
वरील सर्व प्रक्रियेमुळे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाया जाणारा वेळ वाचेल. दरवेळी आरटीओमध्ये होणारी फरपट टाळता येईल. त्यामुळे या डिजिटल उत्क्रांतीचा सामान्यांना नक्कीच फायदा होईल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/