संत रामपालवरील आरोप मागे घ्या, मुक्तता करा...
जळगाव, 16 नोव्हेंबर
कबीरपंथी संत रामपालजी महाराज यांच्यावरील निखालस खोटे आरोप मागे घ्यावेत आणि त्यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी 18 रोजी त्यांच्या अनुयायांतर्फे देशभर काळा दिन पाळला जाणार असून शांततापूर्ण मोर्चा (रॅली) काढण्यात येणार आहे.
जळगावात रविवारी हा मोर्चा सकाळी 8 वाजता डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून निघेल...टॉवर, नेहरु चौक, शिवपुतळा, बसस्थानक, स्वातंत्र्यचौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 वाजता जाईल आणि जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले जाईल.
सहभागाचे आवाहन शिवाजी रामसिंग पाटील, जितेंद्र अशोक पवार, अनंत भानुदास पाटील आदी भक्तगणांनी केले आहे.
संत रामलालजी महाराज यांचे सामाजिक सुधारणा, परिवर्तनात मोठे योगदान आहे,
त्यांचा एकही अनुयायी कोणतेही व्यसन करीत नाही, हुंडा देत व घेतही नाही.अपहार करीत नाही... हरयाणा सरकारने अत्याचार करीत त्यांना अनेक गुन्ह्यांमध्ये गोवले आहे, त्यातील 6 खटल्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, असेही भक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.