उत्तर प्रदेशच्या लखनौ मधील इस्लाम स्वीकारलेल्या १५ जणांची नुकतीच घरवापसी करण्यात आली. लखनौच्या गोमती नगरमध्ये, विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या सदस्यांनी शंखनाद आणि मंत्रौच्चारात या १५ जणांना हिंदू धर्मात परत आणले. घरवापसीच्या कार्यक्रमावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Read More
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील ४५ मुस्लिम परिवारांनी सनातन धर्मात घरवापसी केली आहे. घरातील दिवंगत व्यक्तिचे ११ डिसेंबर २०२४ रोजी हिंदू विधींमध्ये अंतिम संस्कार केले. अंतिम संस्कारानंतर गंगा स्नान करुन १५० लोकांनी हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला आहे. सनातन धर्मात परतल्यावर सलमान खान ( Salman ) नाव बदलुन संसार सिंह ठेवले गेले. मुघलांच्या अत्याचाराने त्यांचे पुर्वज हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्मात धर्मांतरित झाले होते, हे कबुल करुन त्यांनी गौरीशंकर गोत्र स्वीकारले आहे.
उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये शानम नावाच्या मुस्लिम मुलीने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. यानंतर तिने तिचा प्रियकर रुपकसोबत मंदिरात लग्न केले. शानम आता शालिनी म्हणून ओळखली जाईल. यापूर्वी तरुणीच्या नातेवाईकांनी रुपकचे अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एका ख्रिश्चन घरातील नऊ सदस्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला