लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील ४५ मुस्लिम परिवारांनी सनातन धर्मात घरवापसी केली आहे. घरातील दिवंगत व्यक्तिचे ११ डिसेंबर २०२४ रोजी हिंदू विधींमध्ये अंतिम संस्कार केले. अंतिम संस्कारानंतर गंगा स्नान करुन १५० लोकांनी हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला आहे. सनातन धर्मात परतल्यावर सलमान खान ( Salman ) नाव बदलुन संसार सिंह ठेवले गेले. मुघलांच्या अत्याचाराने त्यांचे पुर्वज हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्मात धर्मांतरित झाले होते, हे कबुल करुन त्यांनी गौरीशंकर गोत्र स्वीकारले आहे.
घरवापसी केलेले परिवार हे दिल्ली येथे वास्तव्याला आहेत. १९४७ च्या भारत पाकिस्तान फाळणीनंतर हे परिवार भारतात येऊन राहिले. गेली ४ वर्षे हिंदू धर्मात परतण्याच्या विचारात त्यांना आजूबाजूच्या समाजाचा त्रास सहन करावा लागला, तरी त्यांचे परतण्याचे प्रयत्न सुरुच होते. अखेर शेवटी त्यांनी ११ डिसेंबरला मृत व्यक्तिच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या, तिथेच बृजघाटावर गंगा स्नान करुन इस्लामचा त्याग करुन त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. त्यांनी शीवपार्वतीची पूजा करुन गौरीशंकर हे गोत्र आपलेसे केले आहे. भविष्यात सर्व हिंदू सणसमारंभ साजरे करणार असल्याचेही त्यानी सांगितले.
यातील मुख्य जे इस्लामी सलमान खान या नावाने ओळखले जायचे ते आता संसार सिंह या नावाने ओळखले जाणार आहेत. अशाप्रकारे त्यांनी संजू, सतिश, बलवान, राजेश, संजय अशी धर्मांतरित व्यक्तिंची नावे ठेवली आहेत. या सर्वांनी भारतातील हिंदूंचे हित सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.