धर्मांतर केलेल्या हिंदू कुटुंबाची जवळपास ५ दशकाने घरवापसी

गेल्या काही महिन्यात अनेक कुटुंबाची हिंदू धर्मात घरवापसी

    11-Jan-2022
Total Views |

Karnataka
 



नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक कुटुंबांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. असहातच ५० वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या कुटुंबानेदेखील पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारण्याची तयारी केली आहे. कर्नाटकमधील गुरुमितकल तालुक्यातील कनिकल गावात राहणारे ५५ वर्षीय कामगार टिमोथी होसमनी हे पत्नी आणि मुलांसह हिंदू धर्मात घरवापसी करण्याची तयारी केली आहे.
 
 
यावेळी टिमोथी होसमनी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, " माझा मोठा मुलगा बेंगळुरूमध्ये मजूर म्हणून कां करतो. तर इतर दोघे अजूनही त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. माझ्या आई वडिलांनी मी लहान असताना ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले. त्यावेळी माझ्या आईवडिलांनी कोणत्या परिस्थितीत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला याची मला कल्पनाही नव्हती. आता आम्ही आमच्या मूळ धर्मात परतण्याची तयारी करत आहोत."
 
 
पुढे त्यांनी सांगितले की, "माझे पलक हे पुन्हा हिंदू धर्मात पुनर्परिवर्तन करण्याच्या विरोधात होते. मात्र, माझ्या वडिलांचे १० वर्षांआधी, तर आईचे ६ वर्षांआधी निधन झाले. असे असले तरीही माझ्या कुटुंबातील बाकीचे सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू विधी आणि परंपरांचे निरीक्षण करत होते. मात्र, आता आम्ही आपल्या मूळ धर्मात परतण्याचा निर्धार केला आहे."