‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या नुकसानाचे पुरावे दिले आहेत, तसेच पुरावे भारताच्या झालेल्या नुकसानाचे परदेशी प्रसारमाध्यमांनी द्यावे. परदेशी प्रसारमाध्यमांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे खोटे वार्तांकन केले आहे, अशा शब्दात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी शुक्रवारी परदेशी माध्यमांना फटकारले आहे.
Read More
जगाच्या इतिहासात अनेक शूरवीरांची यादी आहे, ज्यांच्या अचाट पराक्रमाने शत्रूपक्षालाही आश्चर्याने बोटे तोंडात घालायला भाग पाडले. प्रसंगी अशा शूरांनी हौतात्म्य पत्करले किंवा मातृभूमीचा सर्वोच्च गौरव त्यांना मिळाला. मात्र, पाकिस्तानमध्ये असे काहीही झाले नसताना लष्करप्रमुख मात्र ‘फील्ड मार्शल’ झाले. त्याच कहाणीचा हा आढावा...
'सिंदूर' उड्डाणपुलामुळेकर्नाकच्या काळ्या इतिहासाची पाने पुसली गेली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केले आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांच्या हस्ते 'सिंदूर' उड्डाणपुलाचेलोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री फडणव
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभरात भारतीय संरक्षण उपकरणांची मागणी वाढली असून जगाचे भारतीय संरक्षण क्षेत्राकडे लक्ष लागले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले आहे. महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईदरम्यान काँग्रेस पक्षाला “राष्ट्राच्या शत्रूंची बाजू घेणारा” असे विधान रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केले होते. या विधानावरून काँग्रेस नेते पवन खेरा यांनी गोस्वामी यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवार,दि. ७ जुलै रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषशैंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर पार पडली
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जखमा दिल्या. तसेच, अनेक प्रकारचे निर्बंध लावून पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताने पाकिस्तानातून येणार्या मालासोबतच माल घेऊन जाणार्या जहाजांनाही आपल्या बंदरांवर प्रवेशबंदी केली असून यामुळे शिपिंगचा खर्च वाढला आहे आणि मालवाहतुकीतही विलंब होत आहे.
भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ नुसार, देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. आरोपीने हे कर्तव्य पाळले नाही आणि अश्या व्यक्तींना जामीनावर सोडणे योग्य नाही, असे म्हणत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अन्सार अहमद सिद्दीकीला फटकारले आहे. फेसबुकवर जिहादचा प्रचार करण्यासाठी “पाकिस्तान जिंदाबाद” अशी पोस्ट टाकणाऱ्या सिद्दीकीला संविधानीक आदर्शांचा अनादर केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचा विशेष अहवाल जम्मू-काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यात २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप हिंदू यात्रेकरूंना ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या गटाने क्रूरपणे ठार केले. मात्र हे केवळ शारीरिक हल्लेच नव्हते. या हल्ल्यानंतर लगेचच माहितीयुद्धदेखील लढले जात होते. परिणामी, या नॅरेटिव्ह वॉरच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक ठरते.
(Parag Jain) केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) म्हणजेच 'रॉ'चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पराग जैन हे १९८९ च्या बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. जैन १ जुलै रोजी दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी पदभार स्वीकारतील. ते सध्याचे प्रमुख रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्यानंतर पराग जैन पदभार सांभाळतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाला भारताच्या दृढ प्रतिसादावर भर दिला आणि शाश्वत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने नऊ प्रमुख संकल्पांवर प्रकाश टाकला.
इस्रायल-इराण संघर्षात इस्रायलच्या सैन्य आणि गुप्तचर संस्था यांच्यातील समन्वय अवघ्या जगाने पाहिला. या समन्वयाने मिळवलेले यश हे साहजिकच आचंबित करणारे ठरले. भारतानेही ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी अशाच सर्व विभागाच्या समन्वयाने भव्य यश मिळवले आहे. असे असले तरीही युद्धाच्या बदलत्या व्याख्यांमध्ये लष्कराचे आणि गुप्तचर संस्थांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण आवश्यक आहे. इस्रायल-इराण युद्धातून भारताने काय बोध घ्यावा, याचा घेतलेला आढावा...
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांवनी पहलगामन येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद असेल तेथे नष्ट करण्याचे धोरण स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत केले आहे.
विशेष प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक वरचष्म्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, हे विसरून चालणार नाही.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक वरचष्म्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, हे विसरून चालणार नाही.
सध्या जगात इराण-इस्रायल युद्धाची भीती दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसते. ते अधिक वाढले, तर ती घराघरात येणार, हेदेखील निश्चित आहे. सामान्य माणसापर्यंत आलेली या युद्धाची प्रत्यक्ष आर्थिक झळ आणि वैचारिक झळ ही त्रासदायक बाबच. तसे बघितले, तर आपला देश गेल्या ११ वर्षांत कितीतरी पटीने विकासाच्या बाबतीत प्रगती करीत आहे. मात्र,
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल जनरल असीम मुनीर यांना ‘मास मर्डरर’ असे संबोधून अमेरिकेतील पाक नागरिकांनी त्यांचे अमेरिकेत स्वागत केले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, अशी टीका आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. नाना पाटोले यांच्या वक्तव्याचा समाचार त्यांनी घेतला.
तुमचं मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करतो, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या बेताल वक्तव्याने काँग्रेसची पाकिस्तानी मानसिकता पुन्हा उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे, असे ते म्हणाले. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावतंय, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंवर केला आहे. नाना पटोलेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांनी पटोलेंना खडेबोल सुनावले.
(EAM S. Jaishankar's Big warning to Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. 'दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल', असे एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे.
भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवाद विरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर पाठविलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतातीलच काही लोकांनी भारतात राहूनच आपल्या सैन्यावर शंका घेतली, पुरावे मागितले आणि दहशतवाद्यांचा बचावही केला. त्यांच्या बोलण्याचा वापर पाकिस्तानने थेट जगासमोर केला आणि भारताला बदनाम करण्याचा प्रयत्नही केला. ही केवळ लोकशाहीला अपेक्षित मतभिन्नता नव्हती, तर भारताच्याच विरोधात उभी राहण्यासारखी गोष्ट होती. आज फक्त सरकारच नाही, तर प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने अशा लोकांनी अशा लोकांना चोख उत्तर दिलं पाहिजे.
काँग्रेस नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असलेले त्यांचेच आणखी एक नेते सलमान खुर्शीद यांच्यावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड केल्याबद्दल आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केल्याबद्दल नुकताच हल्ला चढवला. थरूर यांनी ज्याप्रमाणे अशा नेत्यांना त्यांचे नाव न घेता उत्तर दिले, त्याचप्रमाणे खुर्शीद यांनीही तेच केले. यासोबतच त्यांनी आपली वेदना व्यक्त करताना असा प्रश्नही विचारला की, “देशभक्त असणे इतके कठीण आहे का?” हा फक्त एक प्रश्नच नाही, तर एक वेदना असल्याचे दिसते. अर्थात, काँग्रेसमध्ये हे नवीन नाही. यापूर्वी गांध
अमेरिकेत ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना त्यांच्या मुलाने पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले. शशी थरूर आणि त्यांची टीम दहशतवादाविरोधी मोहिमे अंतर्गत विविध देशाना भेट देत आहेत. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग होता का? कोणत्याही देशाने तुमच्याकडे पुरावे मागितले का? असे काही प्रश्न ईशान थरूर यांनी विचारले. ईशान थरूर हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार आहेत.
स्त्रीचा पराक्रम हा भारतीयांसाठी नवा नाहीच. ‘रणचंडिका’, ‘रणरागिणी’ अशा अनेक बिरुदावल्यांचे सृजन भारतीय स्त्रियांच्या अचाट पराक्रमानेच सिद्ध केले. काळ बदलला, मात्र स्त्रियांचा पराक्रम तसाच राहिला. आज भारतीय सैन्यातील स्त्रीशक्तीने तिच्या तेजाची ओळख नुकतीच पाकिस्तानला करून दिली, तर दुसरीकडे देशसेवेसाठी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तून महिलांची पहिली तुकडी देशसेवेची शपथ घेती झाली. यानिमित्ताने ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तील या महिला तुकडीच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि त्याचे ९३ हजार सैनिक यांना भारताने पाकिस्तानला परत केले. त्याला ‘शरणागती’ म्हणतात. चिनी कम्युनिस्ट पार्टीबरोबर केलेला गुप्त समझोता, हे काँग्रेसच्या आणखी एका शरणागतीचे ताजे उदाहरण. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानलाच नव्हे, तर अमेरिकेलाच शरणागती पत्करायला लावली आहे.
(Parliament Monsoon Session 2025) संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दि. ४ जून रोजी दिली आहे. २१ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान संसदेचे हे पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे एक गोष्ट भारताच्या लक्षात आली, ती म्हणजे दहशतवादाविरोधी लढाई भारताला एकट्यालाच लढावी लागणार आहे. भारत हा जागतिक स्तरावरील ‘ब्रिस’, ‘क्वॉड’ वगैरे अनेक गटांचा सदस्य आहे. पण, या गटांतील कोणतेही देश या दहशतवादाविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. ‘जी-७’ या बड्या देशांच्या आगामी बैठकीचे तर जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला निमंत्रणच देण्यात आलेले नाही.
विशेष प्रतिनिधी संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात नियोजित आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीचा केंद्र सरकार विचार करत नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
"भारताने ४८ तासांची लढाई आठ तासांत जिंकली आणि याच दरम्यान पाकिस्तानने चर्चेचा प्रस्ताव दिला,” असे सांगताना " ‘ऑपरेशन सिंदूर’मागचा मूळ विचार पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबवणे हा होता,” असे प्रतिपादन भारताचे संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी केले. पुणे विद्यापीठात ‘फ्यूचर वॉर अॅण्ड वॉरफेअर’ या विषयावर मंगळवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीयांना पुन्हा एकदा स्वदेशीचा मंत्र दिला. या मंत्राचा महिमा, त्याची शक्ती अगाध आहे. एक जुलमी राजवट उलथून टाकण्याचे काम याच स्वदेशीच्या मंत्राने केले होते. आजही 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशीशिवाय पर्याय नाही, हेच खरे...
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत भारताच्या शूर लेकींनी असामान्य पराक्रम दाखवला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचे कौतुक केले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्य आयोजित 'लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलना'स संबोधित करताना ते बोलत होते.
(Kolkata police arrested Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामहून अटक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असून, कोलकात्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
पहगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट होती. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन हलचाली सुरु होत्या, त्यानुसार काहीतरी मोठं घडणार असा प्रत्येकालाच विश्वास वाटत होता. त्यानंतर जे घडलं , ते सर्व जगाने पाहिले. भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले, अशी भावना माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, एस. एस. हसबनीस आणि एअर मार्शल एस. एस. सोमण यांनी व्यक्त केले.
पहलगाम हल्ल्यानंतरच्या एका महिन्यात भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी कारवाई करत, पकिस्तानचे मोठे नुकसान केले. केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक आणि कूटनीतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्यात भारत यशस्वी ठरला. या घटनाक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला अधिक पाठिंबा मिळाला. या ऑपरेशनचे परिणाम आणि जागतिक पातळीवरील त्याचा प्रभाव याचा घेतलेला आढावा...
विशेष प्रतिनिधी ऑपरेशन सिंदूरमध्ये संपूर्ण जगाने भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांची आणि मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. त्याचवेळी शत्रू कोठेही असला तरी त्यास उध्वस्त करण्याची भारताची क्षमताही सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे शुक्रवारी केले आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पकिस्तानच्या फाळणीचा विषय पुन्हा चर्चेत आला. नजीकच्या भविष्यात पाकिस्तानची फाळणी होईल का? याबद्दल जाणून घेताना, आपण गेल्या दोन लेखांमध्ये बलुचिस्तान आणि सिंध प्रांताबद्दल माहिती घेतली होती. आता बघूया वायव्य सरहद्द प्रांताकडे...
(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्त्वात परदेशात भारत सरकारचे एका शिष्टमंडळ भूमिका मांडण्यासाठी दौऱ्यावर आहे. मात्र, काँग्रेसला याचा पोटशूळ उठल्याने सातत्याने थरूर यांच्यावर टीका केली जात आहे. जागतिक व्यासपीठावर स्वपक्षीय खासदार देशाची बाजू मांडत असताना अशाप्रकारे त्यांच्यावर टीका करण्याचे नीच कृत्य काँग्रेस सरकारकडून सुरू आहे.
पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारले. ते ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाकिस्तानने हे समजून घ्यावे की आम्ही तीन वेळा घुसून हल्ला केला आहे. पाकने पुन्हा दहशतवादी हल्ला घडविल्यास आणखी जोरदार प्रहार करण्यात येईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथून पाकिस्तानला इशारा दिला.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर पाकिस्तानचा बुरखा फाडत आहेत, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने थरूर यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतही ही विमाने देशांतर्गत निर्माण करून हवाईदलाला बळ देणार आहे.
पाकिस्तानची संपूर्ण यंत्रणा ही दहशतवादावर आधारलेली आहे. ते दहशतवाद्यांचे आश्रयदाते आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या उपद्रवाचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतात. मात्र, याउलट भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारत जबाबदार देश आहे. आम्ही दहशतवादाबद्दल एक ठाम भूमिका घेत कायमच विरोध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद आम्हाला मान्य नाही, अशी ठोस भूमिका जनता दल युनायटेड (जेडीयू) खासदार यांनी सिंगापूरमध्ये मांडली. ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका पोहोचविणाऱ्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी हे भाषण दिले. त
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे बुधवारी इटलीला आगमन झाल्यानंतर, शिष्टमंडळाने रोममध्ये इटलीच्या सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षा स्टेफानिया क्रॅक्सी यांची भेट घेतली.
आज जगाची नजर भारतावर आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे जे धाडसी पाऊल उचलले ते सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र दहशतवाद पाकिस्तानच्या डीएनए मध्ये खोलवर रुजलेला आहे, काही तुरळक कारवायांनी तो संपवता येणार नाही, असे मत मानवाधिकार संरक्षक, पत्रकार आणि बलुच देशभक्त मीर यार बलुच यांनी व्यक्त केले. बुधवारी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले, त्यातून त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी आवाहन केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या देशाबाहेरील तसेच, देशांतर्गत देशविरोधी शक्तींसाठी सरकारने ते तयार ठेवले आहेत.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक वर्षे प्रलंबित असळवळव ऐतिहासिक निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आले. मोदीजींच्या कार्यकाळात भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे आणि २०४७ साली आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू, हा विश्वास आहे. हा बदललेला भारत आहे, जो आमच्या माता भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना, त्यांच्या घरात घुसून मारतो. आज संपूर्ण जगाला 'सिंदूर' या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व समजले. ऑपरेशन
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ कॅमेऱ्यासह करून त्याविषयी कोणासही पुरावे मागण्याची जागा ठेवली नसल्याचा टोला विरोधी पक्षांना लगावला.