Operation Sindoor : कधी सुपर प्रवक्ता, तर कधी जुन्या पुस्तकांचा दाखला! थरूरांच्या दौऱ्यामुळे काँग्रेस नेत्यांना उठतोय पोटशूळ!
29-May-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्त्वात परदेशात भारत सरकारचे एका शिष्टमंडळ भूमिका मांडण्यासाठी दौऱ्यावर आहे. मात्र, काँग्रेसला याचा पोटशूळ उठल्याने सातत्याने थरूर यांच्यावर टीका केली जात आहे. जागतिक व्यासपीठावर स्वपक्षीय खासदार देशाची बाजू मांडत असताना अशाप्रकारे त्यांच्यावर टीका करण्याचे नीच कृत्य काँग्रेस सरकारकडून सुरू आहे.
थरूर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल वक्तव्ये करताना केंद्र सरकारचे केलेले कौतूक काँग्रेसच्या पचनी पडणे अशक्य होत आहे. याच्याच पोटशूळातून त्यांनी खासदार थरूर यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते उदित राज यांनी थरूर यांना भाजपचे सुपर प्रवक्ता म्हटले होते... तर काँग्रेसचे आणखी एक नेते पवन खेरा यांनीसुद्धा थरूर यांच्याविरुद्ध टीका करत थरूर यांच्याच 'द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकाचा हवाला दिला आहे.
काय म्हणाले पवन खेरा?
पवन खेरा यांनी थरूर यांच्याविरुद्ध टीका करत थरूर यांच्या 'द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर'या पुस्तकाचा हवाला दिला आहे. त्या पुस्तकात असे लिहिले आहे कि, ''२०१६ मध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि म्यानमारमध्ये बंडखोरांच्या शोधात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचा निवडणूक प्रचारात लज्जास्पद वापर करण्यात आला. काँग्रेसने कधीही असा मूर्खपणा केलेला नाही.'' मी थरूर यांच्याशी सहमत आहे जे की त्यांनी २०१८ मध्ये लिहीलेल्या 'द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर' पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकबद्दल लिहिले होते.
थरूरांना म्हटले सुपर प्रवक्ता!
यापूर्वी थरूर यांच्यावर केलेल्या टीकेत काँग्रेस नेते उदित राज यांनी म्हटले होते की, त्यांना भाजपचे मुख्य प्रवक्ते घोषित केले पाहिजे. उदित राज यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते - 'शशी थरूर, मी पंतप्रधान मोदींना तुम्हाला भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून घोषित करण्याची विनंती करण्यास पुढाकार घेऊ शकतो, तुम्ही भारतात येण्यापुर्वी तुम्हाला परराष्ट्र मंत्री म्हणून घोषित करण्याची विनंतीही करू शकतो.' सातत्याने शशी थरूर यांच्यावर टीका करण्यात काँग्रेस पक्ष धन्यता मानत आहे.