प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला अयोध्येत रामजन्मभूमीत संपन्न होणार आहे. संपुर्ण देश या दिवसाची गेली अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहात होते. अखेर तो क्षण आला असून मनोरंजन विश्व देखील चित्रपट, गाणी या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतेच सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी संगीतबद्ध केलेले ‘ह्रदय मै श्रीराम है’ गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांचा आवाज लाभला आहे.
Read More
गेली १६ वर्ष संदीप खरे आणि सलील कुलकर्णी 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम यशस्वीपणे सादर करत आहेत. मात्र 'त्यांच्या' आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी, त्यांच्या 'आयुष्यावर बोलू काही' च्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी महाMTB आणि 'मुंबई तरुण भारत'ने त्यांच्याशी संवाद साधला.