‘हृदय मे श्रीराम है हर कंठ मे श्रीराम है’, सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांच्या सुरांतून सजले रामाचे गाणे

    16-Jan-2024
Total Views |
 
aarya ambekar and suresh wadlakr
 
मुंबई : प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला अयोध्येत रामजन्मभूमीत संपन्न होणार आहे. संपुर्ण देश या दिवसाची गेली अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहात होते. अखेर तो क्षण आला असून मनोरंजन विश्व देखील चित्रपट, गाणी या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतेच सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी संगीतबद्ध केलेले ‘ह्रदय मै श्रीराम है’ गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांचा आवाज लाभला आहे.
 

aarya ambekar 
 
‘ह्रदय मै श्रीराम है, हर कंठ मै श्रीराम है’ असे या गाण्याचे बोल असून १६ जानेवारी २०२४ रोजी हे गाणे ऑडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे गीत संदीप खरे यांचे असून संगीतबद्ध सलील कुलकर्णी यांनी केले आहे. प्रभू श्रीरामाच्या आगमनामुळे खरोखरीच संपुर्ण विश्व हे राममय झाले आहे आणि प्रत्येकजण आपल्यापद्धतीने रामाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.