हरियाणाच्या मेवात भागातील नुँहमध्ये एमएसएम, मोबाईल इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. सोमवार, दि. २२ जुलै २०२४ येथे ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात येणार आहे, त्यासंदर्भात सरकार सतर्क आहे. गतवर्षी ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला होता. ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता.
Read More
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मेवातच्या नूह येथे हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर झालेल्या हल्ल्यामागे मोठा कट असल्याची शंका व्यक्त केली आहे. पीडित जे काही बोलत आहेत त्यावरूनही हा हल्ला अचानक नव्हता हेच दिसून येते. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. मुस्लिम जमाव हिंदूंची वाट पाहत होता. हिंदूंना रात्रीपर्यंत मंदिरात रोखून धरून त्यांची हत्या करण्याची त्यांची योजना होती. असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
केंद्र सरकार हरियाणाच्या मेवातमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) चे विशेष आणि कायमस्वरूपी स्टेशन स्थापन करणार आहे. मुस्लिमबहुल असलेला हा जिल्हा अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच आरएएफच्या कायमस्वरूपी स्टेशनची पायाभरणी करणार आहेत.
हरियाणाच्या मेवातमध्ये सोमवारी (३१ जुलै २०२३) हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले. त्याचवेळी डझनभर वाहने पेटवून देण्यात आली. या दंगलीतील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक जखमी हरियाणा पोलिस कर्मचारी नूह दंगलीची माहिती देत आहे.
३१ जुलै २०२३ रोजी हरियाणातील मेवात येथील नूह येथे हिंदूंच्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. हिंसाचारग्रस्त भागात अजूनही हजारो यात्रेकरू अडकले आहेत, असे मीडिया अहवालात म्हटले आहे. दरम्यान, हिंसाचाराची आग गुरुग्राममधील सोहनापर्यंत पोहचली आहे. येथेही वाहनांना आग लावल्याचे वृत्त आहे.
हरियाणातील नूह येथील ब्रज मंडल यात्रेवर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. दंगेखोरांनी ५ गाड्या पण पेटवून दिल्या. तणावाची स्थिती पाहता नूह आणि हातीनमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.