चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार, दि. १५ जून रोजी, सकाळी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या SV-3112 विमानाचे लँडिंग अतिशय भितीदायक परिस्थितीत झाले. विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघाल्याने विमानतळ प्रशासनाची ताराबंळ उडाली.विमानात २४२ हज यात्रेकरू उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
Read More
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी- भेडशी ते राज्य हद्दीमधील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी दिनांक ३१ ऑक्टोबर अखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘आमच्या विमानात एक घोडा सैरावैरा धावतोय, आम्हाला त्याला पकडता येत नाहीये.आम्हाला इमर्जन्सी लँडिंग करायची आहे..." होय, तुम्ही ते बरोबर वाचलात. ३१,००० फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मदतीसाठी हा ऑडिओ मेसेज पाठवला, तेव्हा त्याचाही यावर विश्वास बसला नाही. ही बाब दि.१६ नोव्हेंबर २०२३ ची आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरती केली जाणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.