तमाम देशवासियांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, शासन, कार्य तसेच वारसा यांची माहिती देशाच्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सीबीएससी’च्या अभ्यासक्रमात शिवरायांच्या इतिहासाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे.
Read More
नाशिकमधील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात अधिकारी मद्य पिताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरजच भासत नसेल तर आम्ही आता करायचे काय ?
येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून आकरावी आणि बारावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शनिवार, ९ रोजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जळगाव जनता सह. बँकेच्या सेवा कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठआप्पा गायकवाड तर प्रमुख अतिथी गोसेवक नरेश खंडेलवाल उपस्थित होते.
केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागच्या माध्यमातून दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शनिवार, दि. २८ एप्रिल रोजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.