पाकवरील चिनी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असून, त्याखाली पाकिस्तान आधीच दबलेला. आता चिनी ड्रॅगन पाकला गिळण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी ‘सीपेक’ या चिनी प्रकल्पावर काम करणार्या, चिनी कामगारांवर दहशतवादी हल्ले घडवून आणले जात आहेत. त्यामुळे चीनसह पाकचे भवितव्य ठरवणार्या, या प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे.
Read More
गरीब राष्ट्रांना कर्जाच्या विळख्यात अडकवून महासत्तेची स्वप्न पाहणार्या चीनने आता युआन अस्त्राचा उपयोग सुरू केलेला दिसतो. रशियापाठोपाठ, सौदी अरेबिया, युएई, ब्राझील यांच्या सोबतच अनेक आफ्रिकी, आशियाई देशांबरोबर व्यापारात चिनी चलन ‘युआन’चा वापर सुरू केला आहे. अमेरिकी डॉलरला हद्दपार करू पाहणार्या या चीनच्या ‘युआन’ची म्हणूनच समीक्षा करणे महत्त्वाचे ठरावे.
पाकिस्तान आणि चीनने हाती घेतलेला ‘सीपेक’ प्रकल्प एकीकडे मरगळलेल्या अवस्थेत असताना, या देशावर आज वीजटंचाईचे मोठे संकट घोंगावते आहे.
कुठल्याही ठिकाणी सरकारतर्फे प्रकल्प उभारणी करताना स्थानिकांची मतंही विचारात घेतली जातात. तसेच त्या संभाव्य प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना कसा अधिकाधिक रोजगार मिळेल, प्रकल्पाबरोबरच त्या क्षेत्राचाही कसा सर्वांगीण विकास होईल, अशा विविध बाबींचा काळजीपूर्वक विचार करणे हे क्रमप्राप्त. बरेदचा आपल्याकडेही प्रकल्पविरोधातून आंदोलन पेटते. प्रकरण न्यायालयात जाते आणि प्रकल्प ठप्प तरी पडतो किंवा त्यातून दोन्ही बाजूंना मान्य असेल असा तोडगा तरी सामोपचाराने काढला जातो.
चीनने आपल्या अभियंत्यांना थेट ‘एके ४७’ रायफल दिली आहे. त्यामुळे पाकचे सार्वभौमत्व पूर्णपणे चीनकडे गहाण पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘सीपेक’ अंतर्गत बांधल्या जाणार्या एका धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ४० जणांच्या टीमच्या बसमध्ये हा स्फोट घडला. या हल्ल्यात १३ जण मृत्युमुखी पडले आणि त्यापैकी नऊ हे चिनी नागरिक होते. मग काय, आपल्या नागरिकांवर आपल्याच मित्रदेशात झालेल्या हल्ल्यामुळे चीन एकाएकी खवळून उठला. त्याने पाकिस्तानकडे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची आग्रही मागणी वजा आदेशच दिला. पण, या घटनेला साधारण एक आठवडा उलटल्यानंतरही पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या हाती कुठलेही धागेदोरे लागले नाहीत.
'सीपेक' प्रकल्प चीनने फेकलेल्या पैशांच्या जोरावर सुरू असून पाकिस्तानने त्यात सामील होत स्वतःला कर्जाच्या गहिऱ्या जाळ्यात अडकवले आहे. आता त्याचेच नकारात्मक परिणाम पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत असून त्या देशाच्या सार्वभौमत्वावरही संकटाचे वादळ घोंघावताना दिसते.
पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या गंभीर उंबरठ्यावर उभा आहे. चीनसाठी मात्र पाकिस्तानची दिवाळखोरी एका मोठ्या संधीच्या रुपात समोर येत आहे.
आर्थिक संकटामुळे ‘सीपीईसी’ चा हल्का-डेरा-इस्माइल खान हा पश्चिमेकडील मार्ग आणि कराची-लाहोर मोटारमार्ग अडचणीत सापडले आहे
सिंध प्रांतामधून हिंदूंना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना नष्ट करण्यासाठी पाकिस्तानातील धर्मवेड्या लोकांकडून हिंदुंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत,