(FBI Arrested 8 Khalistani Terrorists in US) भारतातून फरार असलेल्या आणि अमेरिकेत लपून बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ११ जुलै २०२५ रोजी कॅलिफोर्नियातील सॅन जोक्विन काऊंटीमध्ये एका छापेमारीदरम्यान एफबीआयने भारतीय वंशांच्या आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्टॉकटन, मँटेका आणि स्टॅनिस्लॉस काउंटी आणि एफबीआयच्या स्पेशल युनिटच्या स्वाट पथकांच्या मदतीने एकत्रितपणे ही कारवाई केली.
Read More
९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सोमवार, दि. ७ जुलै रोजी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्या.राजेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने फेटाळली. न्यायालयाने यात स्पष्टपणे नमूद केले की, सालेमने २५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अजून तरी पूर्ण केलेली नाही. प्रत्यार्पणाच्या अटींचा आधार घेत त्याने ही सुटकेची याचिका दाखल केली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्यांच्या हत्येनंचर वारंवार मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक धमकी आली होती त्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली असून धमक
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कॅनडास्थित खलिस्तान समर्थक दहशतवादी अर्शदीप सिंग आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध पंजाब आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या कटाचा भाग असल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले आहे. पंजाब आणि दिल्लीच्या विविध भागात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी एनआयएच्या प्रयत्नांमध्ये ही कारवाई एक मोठी झेप असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
राजस्थानमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांची पत्नी शीला हिने श्याम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे अशोक गेहलोत आणि राजस्थानचे डीजीपी यांचाही तक्रारीत उल्लेख आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, सुखदेव सिंह दोन वर्षांपासून अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सुरक्षेची मागणी करत होते, मात्र त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही.
सिद्धू मुसेवाला यांची रविवारी (२९ मे रोजी) संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
हंसल मेहता करणार वेबसिरीजचे दिग्दर्शन!
विकास दुबेसारख्या गुंडांचा उदय आणि दादागिरी जर थांबवायची असेल, तर आपल्याला देशातील निवडणूक प्रक्रियेत ठोस बदल करावे लागतील व काळ्या पैशाची जी मगरमिठी आपल्या निवडणुकांवर पडलेली आहे, ती तोडावी लागेल.
आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून केले होते पलायन
कधीकाळी तो मुंबईतील अंडरवर्ल्डचा गँगस्टर होता. आज तो प्रसिद्ध धावपटू आहे. त्याचा हा त्याचा थक्क करणारा प्रवास आजच्या आपल्या ‘माणसं’ या सदरात उलगडणार आहोत.
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात शांततेच्या मुद्द्यावर अद्याप समझोता झालेला नसल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगरमधील त्याच्या राहत्या घरातून आज रहाणेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.